fbpx

व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा डच चित्रकार. फक्त ३७ वर्षांच्या आयुष्यात त्याने भरभरून चित्रं काढली. त्याची २१०० चित्रं अभ्यासकांना माहित आहेत. समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं, माणसाचं तो त्याच्या खास शैलीत चित्र काढत असे. रंग लावताना सरळ, गुळगुळीत न लावता, ब्रशने रेघारेघा काढून तो चित्र रंगवत असे.

व्हॅन गॉने  आयुष्यभर मनापासून भरपूर चित्रं काढली. पण त्याच्या मृत्यूनंतर तो खूप जास्त फेमस झाला. असं पुहा कुठल्याही चित्रकाराचं होऊ नये, म्हणून आपण चित्रं समजून घेतली पाहिजेत. चित्रांचं मोल आपल्याला कळलं पाहिजे.

चित्रकार आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतात. चित्रांचा मेंदूवर खोल परिणाम होतो. ती भावनेच्या पलीकडे असतात. अगदी लहान वयापासून मुलांना आपण चित्रं आणि चित्रकार भेटवायला हवेत. आयुष्यभर त्याचा खूप जास्त प्रभाव जाणवत राहील. त्यासाठीच ‘आर्टिस्ट कट्टा’ हे सदर सुरु केलं आहे.

व्हॅन गॉची चित्रं मुलांबरोबर तुम्हीही पहा, त्याचा आनंद घ्या. चित्रांवरून मुलांशी गप्पा मारतां येतील.

व्हॅन गॉ च्या चित्रांवरून प्रेरणा घेऊन मुलांबरोबर एखादं चित्रं आपणही काढून बघूया. प्रत्येक मुलं चित्रं काढेलच असं नाही पण चित्रं पाहून, त्याविषयी गप्पा मारून मूल नक्कीच समृद्ध होईल.

१. व्हॅन गॉ ने स्वतःची खूप चित्रं काढली. त्यातलं हे एक.

2. हे व्हॅन गॉ चं खूप गाजलेलं चित्र. स्टारी नाईट. बघ बरं आकाश आणि चांदण्या आणि चंद्र केवढा वेगळा दाखवला आहे.

३. झाडाला आलेली सुंदर फुलं आणि फक्त निळं आकाश

४. ही व्हॅन गॉ ची स्वतःची खोली, जिथे तो खूप काळ रहायचा.

५. यात जाम्भल्या फुलांची शेती आणि तळपता सूर्य किती देखणा वाटतो बघ.

६. एकदा व्हॅन गॉ ने दुःखी होऊन स्वतःचा कान कापला (खरं तर शरीराला एवढा त्रास कोणीच कधी देऊ नये) आणि त्याला पट्टी लावलेली अशी स्वतःची अनेक चित्रं काढली, त्यापैकी हे एक.

७. यात गवत, शेतं आणि ढग हे किती छान दिसताहेत बघ. असं आपणही बघतो ना पावसाळ्यात सहलीला गेलं की?

८. जेवायला फक्त उकडलेले बटाटे खाणाऱ्या गरीब शेतकरी कुटुंबाचं हे चित्र. रंगही कसे त्यांच्या आयुष्यासारखे राखाडी, तपकिरी वापरलेत पहा.

९. हे द्राक्षाच्या मळ्याचं चित्र. व्हॅन गॉ च्या संपूर्ण आयुष्यात हे एकाच चित्र विकलं गेलं.

abha bhagwat

आभा भागवत

Artist – Wall Art Painting 

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop