
चिकूपिकू – ऑडिओ स्टोरीज | Marathi Audio Stories for Kids
‘ऐकणे’ हे आपण प्राप्त केलेले प्रथम भाषा कौशल्य आहे. जे आपण शिकतो त्यातील 85% आपण ऐकून शिकतो. लहान मुलं गोष्टी ऐकताना एक वेगळं जग बघत असतात. मुलांना जेवण भरवताना, झोपवताना, प्रवासात किंवा दिवसात कधीही या ऑडिओ गोष्टी ऐकवता येतील. अंक समोर ठेवून गोष्ट ऐकायला आणखी मजा येईल. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील.
ChikuPiku offers audio stories in Marathi for toddlers, kids, and parents from all the previous monthly issues. Our Marathi audio-books can also help children in developing the love for books.
September 2023
Aug 2023
July 2023
June 2023
April May 2023
March 2023
February 2023
January 2023
अडम तडम गडम
December 2022
October – November 2022
September 2022
August 2022
Listen to the Marathi audio stories from the ChikuPiku August Ank 2022. चिकूपिकू ऑगस्ट अंक २०२२ (सण स्पेशल थीम)
July 2022
चिकू पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनी नेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक वर्षाच्या छोट्यांनाही आवडेल आणि आठव्या – नवव्या वर्षापर्यंत ही आवडेल अशी भरपूर मज्जा अंकात असणार आहे. वाढदिवस स्पेशल गाणी, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज मुलांना आवडतील. अंकासोबत चिकूचा मुखवटा आणि हातानी करून बघायचं एक छोटं पझलसुद्धा दिलं आहे.
June 2022
आपण मोठी माणसं खूप कमी वेळा आश्चर्यचकित होतो. कारण प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक आपल्या डोक्यात पक्कं असतं. मुलांचं तसं नसतं, त्यांना अनेक गोष्टी आश्चर्यकारक वाटतात. ‘तुला एक गंमत दाखवू?’ असं म्हटलं की त्यांचे डोळे चमकतात. छोटासा किडा, रंगीत कागद, कोडं, छानसं चित्र, ढगांचे आकार अश्या छोट्या-छोटया गोष्टींची गंमत त्यांना वाटते. चिकूपिकूच्या या जून अंकातून ही मजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
अंकात वेगवेगळ्या शैलीतली चित्रं आहेत. मुलांशी चित्रांविषयी गप्पा मारता येतील. एकत्र मिळून नवीन गोष्टी, गाणी तयार करता येतील.
April-May 2022
माऊ गेल्यावर मनूला खूप प्रश्न पडले
माऊ कुठे गेला? पण तोच का गेला?
माऊशिवाय आपण कसं राहायचं?
पण तो कधीतरी तर परत येईल ना?
कधी मनू खूप रडली, कधी ‘नाही-नको’ च्या सूचनांना घाबरली.
कुटुंबाच्या पलीकडची वेगळी कुटुंबं तिनं पाहिली.
आपले जिवलग आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्या दुःखातून कसं सावरायचं आणि आपला आनंद कसा शोधायचा हे मनू हळूहळू शिकली.
अनेक विषय मुलांशी बोलणं आपण टाळतो. एखाद्या व्यक्तीचं/प्राण्याचं अचानक जाणं… एकटेपणा, भीती यातून मार्ग काढणं … मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अशा वेगळ्या गोष्टींचं दार उघडणारं पुस्तक !
March 2022
चिकूपिकूचा हा अंक आहे – हसण्यावर. आपण हसतो तेव्हा सगळ्या शरीराला आनंदाची अनुभूती होते. म्हणूनच मुलं आनंद झाला की उड्या मारतात. टाळ्या वाजवतात. नाचतात. घरभर फिरतात.
या अंकात गोष्टी, सोपे विनोद आहेत. ते आपण मुलांना सांगितल्यावर त्यांनी दुसऱ्यांना सांगावेत, हे तुम्ही नक्की त्यांना सांगा. लगेच नाही, पण हळूहळू हे कौशल्य विकसित होईल. दुसऱ्यांना हसवण्यात पण मज्जा असते, त्यात आपल्यालाही गंमत वाटते. हे त्यांना कळेल.
मुलांनीच नाही, तर आपणही आनंदात राहायला पाहिजे. हसायला पाहिजे. असं म्हणतात की लहानपणी मुलं खूप हसतात. मोठेपणी मात्र हसणं कमी होतं. हसणं कमी झालं की शरीरात कुठे कुठे साचलेले आजार डोकं वर काढायला लागतात. म्हणून या अंकातून हा छोटासा हास्ययोग घेऊन येत आहोत.
म्हणतात ना Smile is free therapy!
February 2022
चिकू पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनी नेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक वर्षाच्या छोट्यांनाही आवडेल आणि आठव्या – नवव्या वर्षापर्यंत ही आवडेल अशी भरपूर मज्जा अंकात असणार आहे. वाढदिवस स्पेशल गाणी, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज मुलांना आवडतील. अंकासोबत चिकूचा मुखवटा आणि हातानी करून बघायचं एक छोटं पझलसुद्धा दिलं आहे.
January 2022
कुटुंब म्हटल्यावर एकमेकांची काळजी घेणं, मदत करणं, प्रेम व्यक्त करणं, एकत्र मिळून काम करणं हे मुद्दे गोष्टी, गाणी, आणि ऍक्टिव्हिटीज मधून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अंकातून करत आहोत.
ही पृथ्वी म्हणजे माझं मोठ्ठ कुटुंब आहे. तिच्यावर नांदणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. ही भावना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘वसुधैव कुटुंबकम’ हा खास भारतीय विचार कव्हर थीममधून मांडला आहे.
December 2021
आपण जितक्या सहजपणाने चालतो, तितक्याच सहजपणाने पक्षी फक्त आपले दोन पंख पसरवतात आणि आकाशात गोल गिरक्या मारतात. या उडणाऱ्या पक्ष्यांना चिकूपिकूच्या डिसेंबर अंकाने यावेळेला आपल्या जवळ आणलं आहे. पक्षी खरे कसे असतात, त्यांचं जग कसं असतं? मुलांच्या मनात पक्षांविषयीचं नवं कुतूहल तयार होईल. पक्ष्याच्या गोष्टी, पक्ष्यांची गाणी ,पक्ष्यांची चित्रं हे सगळं करून – बघून – ऐकून मुलांना नक्की छान वाटेल. गॅजेट्सच्या दुनियेत हरवून जाऊ नये म्हणून आपल्या मुलांना निसर्गाची जाणीव करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.
उचापती गोलू
गोलू त्याच्या आई बाबांबरोबर आणि बाकीच्या मुग्यांबरोबर एका वारुळात राहतो. वारुळाच्या शेजारी ढोलू राक्षसाचा महाल आहे. रोज गोलूचे बाबा इतर मुंग्यांबरोबर ढोलू राक्षसाच्या महालात शिरून हळूच खाऊ घेऊन येतात. गोलूलासुद्धा बाबांबरोबर ढोलू राक्षसाच्या महालात जायचंय. गोलू बाबासोबत महालात गेल्यावर नक्की काय बरं घडलं असेल?
छान रंगीत चित्रं असलेली ही मजेशीर गोष्ट मुलांबरोबर वाचायला नक्की मज्जा येईल.
Diwali Ank 2021
मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ऍक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.
बाप्पा आणि गप्पा
मुलांना आणि आईबाबांना आवडलेला चिकूपिकूचा हा पूर्वी प्रकाशित झालेला अंक ‘बाप्पा स्पेशल पॅक’ मधून पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे !
अंकातल्या गणपतीविषयीच्या गमती-जमती आणि धमाल चित्रं मुलांना नक्की आवडतील. त्याचबरोबर पावसाळा या थीमवरच्या वेगळ्या गोष्टी, कविता आणि ऍक्टिव्हिटीजसुद्धा अंकात आहेत. अंकामध्ये ‘पंख फडफडणारे फुलपाखरू’ हे ऍक्टिव्हिटी शीट फ्री देत आहोत.
या बाप्पा स्पेशल पॅकमध्ये असलेला गणपती बाप्पाचा बॅज मुलं आवडीने वापरतील.
September 2021
“Coming together” ही या अंकाची थीम आहे. गेलं एक-दीड वर्ष आपण घरातून फारसे बाहेर पडत नाही आहोत. पण काही निमित्ताने भेटलो की एकत्र येऊन छान वाटतं. सगळे मिळून केलेली मजा, मस्ती, गप्पा, शेयरिंग आणि एकमेकांशी जुळवून घेणं हे अनुभव चिमुरड्यांसाठी महत्त्वाचे आहेत.
याच थीमवर आधारित अंकाचं कव्हरसुद्धा जरा हटके केलेलं आहे. कापडाचे अनेक छोटे-छोटे तुकडे एकत्र येऊन तयार केलेल्या गोधडीच्या चित्रात मुलं आणि आई-बाबा नक्की रमतील. अंकातल्या गोष्टी आणि गाण्यांमधून एकत्र मिळून केलेली धमाल मुलांना अनुभवता येईल. अंकासोबत पिकू पक्ष्याचं एक क्राफ्ट शीटसुद्धा दिलेले आहे. कातरकाम, चिकटकाम, चित्र रंगवणे या सगळ्या गोष्टी आपणसुद्धा मुलांबरोबर आवडीने करून बघू या!
August 2021
लहान वयात मुलांचे जवळचे मित्र मैत्रीण म्हणजे त्यांचे आई बाबाच असतात. मुलं मोठी होतात, त्यांना मित्र मैत्रिणी मिळतात. त्यांच्याबरोबर खेळणं, मज्जा करणं, खिदळणं, रुसवा, भांडणं हे सगळं अनुभवतच मैत्री वाढत जाते.
या अंकातून मैत्रीचे हे अनुभव मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
July 2021
झाडं, प्राणी, पक्ष्यांना पाऊस आवडतो आणि तितकाच तो छोट्या मुलांनाही आवडतो. कधी रिमझिम, कधी धो-धो, तर कधी वाऱ्याबरोबर भुरभुरणाऱ्या पावसाचं मुलांना खास आकर्षण असतं. चिकूपिकूचा हा पावसाळा स्पेशल अंक मुलांना पावसाळ्यातल्या गमती-जमतींच्या जवळ घेऊन जाईल. जे अनुभव मुलांना घरात बसून देता येणार नाहीत ते या अंकातल्या गोष्टी, गाणी आणि activities मधून नक्की पोहोचू शकतील.