fbpx

Abha Bhagwat

बालकथा लेखक

चित्र काढणे ही प्रत्येक लहान मुलाची पहिली अभिव्यक्ती असते. हातात ठेवलेल्या पेन्सिल,पेन, क्रेयॉन्स अशा कोणत्याही वस्तूने दिसेल तिथे अगदी भिंतीवरही रेघोट्यांची चित्रे उमटू लागतात. म्हणूनच रंगीबेरंगी चित्राच्या गोष्टीही मुलांना चटकन आपल्याशा वाटतात. यासाठी आभा भागवत चिकूपिकूमध्ये ‘चिमणी चित्र’ या सदरांतर्गत चित्रातील वैविध्य वापरून मुलांसाठी दर महिन्यात काही रंजक अॅक्टिविटीज घेऊन यात आहेत.

आभा भागवत या चित्रकार असून त्यांनी आनंदवनातही तेथील रहिवाशांच्या मदतीने चित्रकला साकारली आहे. मोठमोठी वॉलपेंटिंग्ज काढण्यासाठी त्या सुप्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास दीडशे वॉलपेंटिंग्ज काढली आहेत आणि ही सर्व चित्रे त्यांनी वेगवेगळ्या गटाबरोबर काढली आहेत. लहान मुलांना बरोबर घेऊन काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे. बालभारतीच्या पुस्तकाची मुखपृष्ठेही त्यांनीच तयार केली आहेत.

’चिमणी चित्र’ मधील उपक्रमांमध्ये मुलांबरोबर सहभागी होऊन आपणही चिकूपिकूसह चित्रमय सफरीवर जाऊयात.

गुड मेन इन मेकिंग

गुड मेन इन मेकिंग

माझे बाबा घरी विशेष काम करत नसत. त्यांच्या आईने कधी शिकवलं नाही आणि ‘मुलगा मुलगा’ म्हणून करूही दिलं नाही असं ते सांगत. हीच कथा अनेक घरांमध्ये तेंव्हाही असे आणि अजूनही आपल्या पिढीतच काय पुढच्या पिढ्यांमध्येही दिसते. समजायच्या वयात आल्यापासून घरातली कामं आईच करणार आणि...

लॉकडाऊन मधलं खरं शिक्षण

लॉकडाऊन मधलं खरं शिक्षण

लॉक डाऊनची सुट्टी मोठंच आव्हान घेऊन आली खरी, ते म्हणजे मुलं शाळेत गेली नाहीत तर घरी रमतील का? अनेक लहान मुलांना शाळा नसल्यामुळे काही गंभीर प्रश्नांना सामोरं जावं लागलं, त्याबद्दल चर्चाही झाली, मार्ग काढण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी उपाय सुचवले. आपण सगळेही खूप हळहळलो....

आर्टिस्ट कट्टा – व्हिन्सेंट व्हॅन गॉ

आर्टिस्ट कट्टा – व्हिन्सेंट व्हॅन गॉ

व्हिन्सेंट व्हॅन गॉ हा डच चित्रकार. फक्त ३७ वर्षांच्या आयुष्यात त्याने भरभरून चित्रं काढली. त्याची २१०० चित्रं अभ्यासकांना माहित आहेत. समोर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं, माणसाचं तो त्याच्या खास शैलीत चित्र काढत असे. रंग लावताना सरळ, गुळगुळीत न लावता, ब्रशने रेघारेघा...

लॉकडाऊनमधली धमाल

लॉकडाऊनमधली धमाल

लॉकडाऊनचा काळ हे नेमकं काय प्रकारचं संकट आहे आणि काय प्रकारची संधी आहे हे लक्षात येईपर्यंत काही महिने उलटूनही गेलेत आता. पालक आणि शिक्षक म्हणून मी गडबडून गोंधळून गेलेली असताना..

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop