आपल्याला अनेकदा अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. घरातल्या कोणाचा तरी राग अनावर होतो. अवघड परिस्थिती जवळच्यांवर किंवा इतरांवर मनातला राग अक्षरश: फेकला जातो. आदळआपट करून..
Dr. Shruti Panse
नियमितपणे पेपर वाचणाऱ्यांसाठी डॉ. श्रुती पानसे हे नाव नक्कीच परिचयाचे आहे. शिक्षणतज्ञ, लेखक, वक्ता, संशोधक आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. श्रुती पानसे यांनी ‘ब्रेन-बेस्ड लर्निंग’(मेंदू आधारित शिक्षण) या विषयामध्ये एसएनडीटी विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळविली आहे. वेगवेगळ्या एनजीओज, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. तसेच पालक, शिक्षक आणि मानसोपचारतज्ञांसाठी उपयुक्त असणारे टॉक-शो किंवा चर्चांमध्ये त्याचा सहभाग असतो. याशिवाय आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करतात.
त्या मुले आणि पालक यांचे समुपदेशनही करतात आणि त्यांनी आतापर्यंत या संदर्भात 250 हून अधिक कार्यशाळाही घेतल्या आहेत. अभ्यासाची तंत्रे, मुलांशी कसे वागावे, त्याच्या वर्तनातील समस्या कशा हाताळाव्यात, शिकण्यातील अडचणी, भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे वर्तनावर होणारे परिणाम याबाबत त्या मार्गदर्शन करतात. डॉ.पानसे यांच्या मते आपल्या मेंदूच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी मेंदूच्या विशेषतांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.
लहान मुलांच्या मेंदूचा विकास वयाच्या 1 ते 8 वर्षांमध्ये अधिक जोमाने होत असतो हे आता सर्वांनाच माहीत झाले आहे. योग्य वेळी मेंदूची मुलभूत तत्वे आपण जाणून घेतली तर सध्याच्या स्पर्धात्मक युगात मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आपण पाया रचू शकतो, यासाठीच या वयातील मुलांच्या मेंदूला चालना देण्यासाठी त्यांच्या ज्ञानेद्रियांची मनोरंजक सांगड घालून वेगवेगळ्या आठ प्रकारच्या बुद्दीमत्तांचा शोध घेण्याचे काम आपण त्यांच्या संपादकीय कौशल्याने चिकूपिकूच्या माध्यमातून करत आहोत. यापुढील चिकूपिकूच्या प्रत्येक अंकातून त्यांच्या मदतीने आपण आपल्या लहानग्याच्या अफाट उर्जेचा आणि क्षमतेचा शोध घेऊयात. श्रुतीताई ‘फिशिरा’ नावाची चित्रकथामालिका आपल्या चिकूपिकूमध्ये लिहित आहेत.
टाईमटेबल
अभ्यासाचं टाईमटेबल आखलं की सोपं जातं हे मुलांना आणि आईवडिलांनाही माहीत असतं. पण ब-याचदा टाईमटेबल आखण्याचाच कंटाळा केला जातो. टाईमटेबल आखूनही जेव्हा त्यानुसार अभ्यास…
लहान बाळ काय बरं बोलतंय?
“हांहह.. येइइइइ.. इइइइ” हे न कळणारे शब्द म्हणजे टायपिंगची चूक नाही, तर आपल्या घरातल्या बाळाचे हुंकार आहेत. आपल्याला वाटतं या हुंकारांना काहीच अर्थ नाही. पण या हुंकारांना अर्थ असतो…
तान्हुल्याच्या डोक्यात चाललंय तरी काय?
बाळाचा मेंदू कसा काम करतो? बाळाच्या डोक्यात चाललंय तरी काय? तुमच्या बाळाशी वागण्यासाठी तथ्ये आणि टिप्स जाणून घ्या. What is Your Baby Thinking in Marathi?