'गोष्ट' प्रत्येकालाच आवडते, ऐकायलाही आणि सांगायलाही. गोष्ट, आपल्या आयुष्यात अगदी बाळ असल्यापासून येते. बाळाची या गोष्टींशी घट्ट मैत्री असते. मम् मम् भरवण्यापासून ते गाई गाई करेपर्यंत गोष्टी सोबत असतात आणि त्या बाळांशी बोलतही असतात. अगदी चिऊ-काऊच्याच गोष्टींचं उदाहरण...

Swati Upadhye
स्वाती उपाध्ये या ‘प्रेरणा- एक कलामंच’ या रंगभूमी माध्यमासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक आणि संचालिका आहेत तसेच अभिनय, नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे आणि अजूनही करताहेत.
- अभियांत्रिकी क्षेत्रातील आपली कारकीर्द मागे सोडून आपल्या आवडीच्या आणि सर्जनशील आव्हाने असणाऱ्या त्यांनी रंगभूमीवर काम चालू केले.
- रंगमंचीय कारकिर्दीत अनेक स्पर्धा व्यावसायिक व प्रायोगिक नाटके यामधून लेखन दिग्दर्शन आणि अभिनय यामध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. काही चित्रपट, लघु चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका यामधूनही त्यांनी अभिनयासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या.
- रंगभूमी या माध्यमाची ‘व्यक्तिमत्व विकास’ साधण्यासाठी असलेली ताकद लक्षात घेऊन, त्याद्वारे निरनिराळे प्रयोग करायच्या उद्देशाने, स्वतःची प्रेरणा – एक कलामंच ही संस्था चालू केली. अनेक समविचारी आणि सुजाण सहकाऱ्यांच्या साथीने २००६ पासून ही संस्था यशस्वीपणे चालू आहे.
- बालरंगभूमीवर अनेक वैविध्यपूर्ण प्रयोग करून स्वातीताई आणि प्रेरणाने, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय यात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग करत राहणे आवडते. आपल्या लेखनातून संस्कारक्षम आणि कालानुरूप बदलत राहणारे, पण मूल्याधिष्ठित असे विषय त्या सतत हाताळत असतात. त्यालाच पूरक असे अर्थपूर्ण दिग्दर्शन हा हातखंडा. रंगभूमीवर, भविष्यातील सुजाण आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे हे असे मानून ‘प्रेरणा’ चा प्रत्येक उपक्रम त्या उद्दिष्टांशी सुसंगत असावा असा त्यांचा आग्रह असतो.
- पुण्यातील गरवारे बालभवन, प्रिझम फाउंडेशन सारख्या काही संस्थांमध्येही त्या आपले प्रयोग सादर करत असतात आणि कार्यशाळा घेत असतात, अनेक संस्थांमध्ये, मुले, शिक्षक, मुलांसाठी काम करणारे स्वयंसेवक यांच्यासाठी कार्यशाळा चालू आहेत.
- आपण स्वतः काळाबरोबर बदलत राहायला हवे आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला हव्यात हे जाणून. एन. एल. पी. (न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग) यामध्ये मास्टर प्रैक्टिशनर आणि अॅडव्हान्स लाइफ कोच है आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यांचा वापर आपल्या कार्यशाळांमधून चालू केला.
- ‘प्रतिबिंब’ ही सर्व वयोगटांसाठी, सकारात्मक परिवर्तनासाठी ‘स्वओळख’ कार्यशाळा चालू आहे.
- व्यक्तिगत मार्गदर्शनातूनही अनेकांचे समस्या निराकरण.
- बाया कर्वे वूमन्स स्टडी अँड रिसर्च सेंटर – महर्षी कर्वे सी शिक्षण संस्था, इथे जीवनकौशल्यांवर आधारित व्याख्याने
- एम. के. सी. एल नॉलेज फाउंडेशन निर्मित ‘टिली मिली ह्या शैक्षणिक मालिकेचे नाट्यदिग्दर्शन स्वातीताईनी केले आहे. कोरीना काळात ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते त्या मुलांसाठी ‘हसत खेळत आनंददायी शिक्षण’ ह्या संकल्पनेवर आधारित, ‘दूरदर्शन’ वर प्रक्षेपित होणाऱ्या ह्या मालिकेत प्रेरणा – एक कलामंच’ मधील बाल-कुमार-युवा कलाकार सहभागी झाले आहेत.
- कला आणि इतर निरनिराळ्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन हे उद्दिष्ट घेऊन व्यापक आणि दूरगामी परिणाम साधण्यासाठी कार्यरत आहेत.