कोणताही संवाद सुरू होतो जेव्हा आपल्याला त्या संवादाची गरज वाटायला लागते. अनेकदा ही संवादाची गरजच आपल्याला ओळखता येत नाही. अनेक प्रसंगी आपण आपल्या भवतालातील व्यक्तींना, लहान मुलांना गृहीत धरतो आणि अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा मोठं काहीतरी घडतं तेव्हा त्या...
‘घरी येऊन बघ, कबीरने पेपरचे काय काय कटिंग करून ठेवलंय ते…’ सासूबाईंनी फोनवर सांगितले, तेव्हा कागदाचे छोटे-मोठे तुकडे हॉलमधल्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेले माझ्या डोळ्यासमोर आले. ऑफिसमधून घरी गेल्यानंतर ते गोळा करता करता नाकी नऊ येणार आणि होणारी चिडचिड तर...
अलगद रुजावे बीज वाचनाचे “आमच्या घरी टीव्हीच नव्हता,” एक तरुण लेखक सांगत होता. अत्यंत कमी वयात त्याने आपल्या लेखनातून नाव कमावले होते आणि जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. अशा या तरुणाची मुलाखत सुरू होती. “टीव्ही नव्हता आणि आई-वडील दोघेही त्यांच्या मोकळ्या वेळात...
बारा महिने असं म्हटलं की जानेवारी ते डिसेंबर हेच आठवतं. पण मराठी महिने खूप कमी जणांच्या डोक्यात येतात. भारतात हिंदू पंचांगानुसार बारा महिन्यांना बारमास म्हणतात. महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असं म्हणतात. एका महिन्यात ३० दिवस असतात आणि हे महिने चंद्राच्या स्थितीनुसार...
अभ्यासाचं टाईमटेबल आखलं की सोपं जातं हे मुलांना आणि आईवडिलांनाही माहीत असतं. पण ब-याचदा टाईमटेबल आखण्याचाच कंटाळा केला जातो. टाईमटेबल आखूनही जेव्हा त्यानुसार अभ्यास होत नाही, तेव्हा असं समजावं की एकतर केलेलं टाईमटेबल चुकीचं आहे किंवा आपणच केलेल्या टाईमटेबलला आपण...
पुण्याच्या कॉर्पोरेशन शाळांमध्ये एका प्रकल्पाच्या निमित्तानं दोन वर्ष मी सातत्यानं जात होते. तेव्हा घडलेला हा प्रसंग माझे डोळे उघडणारा वाटला. मी वर्गात गेले की दोन-दोन मुलांना फळ्याजवळ बोलावून हातात खडू देऊन चित्रं काढायला सांगायचे. मुलांनी फळ्याला हात लावणं निषिद्धच...