मुलांना आई-बाबा दोघेही हवे असतात. दोघांबरोबर त्यांचं एक वेगळं नातं असतं आणि हे नातं समृध्द करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवे असतात. बऱ्याच घरांमध्ये मुलं वडिलांच्या वाट्याला खूप कमी वेळा येतात. मुलांच्या लालन-पालनाचा बराचसा भार आईवर असतो. आपला समाज पुरुषाला केवळ अधून-मधूनच बाबा होऊ देतो. बाबाची ‘आर्थिक भार उचलणारा, रक्षण करणारा’ ही प्रतिमा अनेक घरांना जास्त आवडते. काही घरात मुलांना कुणाचातरी धाक हवाच म्हणून बाबाचा बागुलबुवा केला जातो. पण यातून मुलं आणि बाबांचं प्रेमाचं आणि सशक्त नातं तयार होत नाही. याउलट आपल्या मुलांसाठी, जोडीदारासाठी आणि घरासाठी मनापासून वेळ देणारा बाबा मुलांपुढे एक चांगलं उदाहरण बनू शकतो.

बाबा सध्या काय करतोय?
असे अनेक वडील आहेत जे ऑफिसच्या कामाबरोबरच मुलांना वेळ देणं, घरातल्या कामांमध्ये सहभाग घेणं या भूमिका आईच्या बरोबरीने बजावत आहेत. मुलं, घर आणि स्वतःचं काम या सगळ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या अश्याच काही बाप-लोकांना भेटू या! त्यांचं कौतुक करू या!
बाल-केंद्री कुटुंब हवं!
मुलं लहान असण्याचा आणि करिअरमध्ये काहीतरी करून दाखवण्याचा काळ बहुतेकदा एकच असतो. अशा वेळेस आई-बाबांनी एकत्र मिळून जबाबदाऱ्या पार पडल्या तर घरातल्या आनंदी उर्जेचा फायदा सगळ्यांनाच मिळतो.
मुलं आणि त्यांच्या गरजा, त्यांचा आनंद, त्यांची सर्वांगीण वाढ या गोष्टी केंद्रस्थानी ठेऊन जेंव्हा एखादं घर चालतं तेंव्हा सक्षम, संवेदनशील, सुजाण मुलं आणि माणसं तयार होतात. या बालकेंद्री घराचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आई, बाबा दोघांनीही काम करत असताना एकमेकांना समजून घेऊन, काही वेळेस मुद्दाम ठरवून मुलांबरोबर वेळ घालवला, त्यांच्या खेळात सहभाग घेतला आणि आपल्या काही कामात त्यांना सहभागी करून घेतलं तर संपूर्ण कुटुंबाला आनंद आणि समाधान मिळू शकेल.
बाबा, मी आणि मस्ती
बाबांना मुलांबरोबर करता येतील अश्या काही ऍक्टिव्हिटीज!! मुलं आणि बाबा एकत्र मजेत वेळ घालवतील. बाबांबरोबरच्या छान आनंदी आठवणी मुलांच्या मनात तयार होतील.
बाबाचे Blog
मुलांचं बालपण हरवण्याचा आधी ते मनापासून बघण्याचा, त्यात सहभागी होण्याचा आनंद घेणारे बाबा, मुलांना वाढवण्यात आईचे साथीदार असलेले बाबा सांगत आहेत त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दात. ह्या ब्लॉग्समध्ये वाचू या त्यांची धमाल, त्यांचे विचार, पॅरेंटिंगमध्ये उपयोगी पडतील अश्या काही कल्पना आणि त्यांनी मनापासून अनुभवलेला आनंद!
The Family That Plays Together, Stays Together…
The Family That Plays Together, Stays Together – पालकांना जर मुलांशी काय खेळावं हे कळलं तर ते नातं अधिकच चांगलं होईल.
मूल आणि निसर्ग
मूल आणि निसर्ग – “How can I feel with my eyes and see with my skin?” हे अनुभवण्यासाठी तंत्रज्ञानापासून लांब आणि निसर्गाच्या जवळ जायला हवं.
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी
ओळख मुलांमधल्या सुप्त गुणांशी – ‘Weed is a plant whose virtues have never been discovered.’ मूल आणि निसर्गातल्या अनेक गोष्टी समांतर असतात.