{"title":"Magazine","description":"","products":[{"product_id":"chikupiku-marathi-magazine-subscription","title":"ChikuPiku  Marathi Magazine Subscription","description":"\u003cspan\u003eदरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, प्रत्येक पानावर रंगीत चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज, गाणी, कोडी आणि बरंच काही. वाचता न येणाऱ्या मुलांपासून ते वाचायला शिकणाऱ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं चिकूपिकू हे लाडकं मासिक आहे.आई-बाबा\/आजी-आजोबा,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही मुलांना जवळ घेऊन यातल्या गोष्टी वाचून दाखवा, ॲक्टिव्हिटीज त्यांच्याबरोबर करून बघा. अगदी १०-१५ मिनिटांच्या या क्वालिटी टाईममुळेसुद्धा मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत होईल. मेंदूत होणारी न्यूरॉन कनेक्शन वाढू लागतील आणि शिवाय मुलांच्या मनात या आनंदी आठवणीसुद्धा कायमस्वरूपी तयार होतील.\u003c\/span\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 year","offer_id":40921050480700,"sku":"","price":1550.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 months","offer_id":40921051103292,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 year","offer_id":40921051070524,"sku":"","price":3100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/only_magazine.webp?v=1755085419"},{"product_id":"marathi-magazine-and-audio-story-subscription","title":"Marathi Magazine and Audio Stories Subscription","description":"\u003ch4\u003e\n\u003cspan\u003e\u003cb\u003eचिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे?\u003c\/b\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शन मध्ये ४ अंक + १ विशेषांक + 6 month audio app \u003c\/li\u003e\n\u003cli\u003e१ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये ८ अंक + २ विशेषांक + 12 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e२ वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये १६ अंक - ४ विशेषांक + 24 months audio app\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eShipping Charges ह्यात समाविष्ट आहेत\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eAudio App मध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी, आणि विविध playlists आहेत, जसेकी - छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, Bedtime stories, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टींचा खजिना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"chikupiku-books","offers":[{"title":"1 Year","offer_id":40963523018812,"sku":"","price":2050.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"6 Months","offer_id":40963523084348,"sku":"","price":1050.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"2 Years","offer_id":40963523051580,"sku":"","price":3375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/two_in_one.png?v=1758007090"},{"product_id":"chikupiku-marathi-audio-stories-subscription","title":"ChikuPiku Marathi Audio Stories Subscription","description":"\u003cp\u003eचिकूपिकूच्या ऑडिओ गोष्टींच्या मेम्बरशीपमध्ये तुम्हाला चिकूपिकूच्या अंकातल्या सर्व गोष्टी ऐकता येतीलच पण त्याचसोबत एकूण ३६५ गोष्टींचा खजिनासुद्धा आम्ही यात देत आहोत. जुन्या क्लासिक गोष्टी, तेनालीराम, पंचतंत्र, गाजलेल्या गोष्टी, देश-विदेशातल्या गोष्टी अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या गोष्टी मुलांना या मेम्बरशीपमध्ये ऐकता येतील. मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी ऑडिओ गोष्टी आपल्याला नक्की साथ देतील. Celebrate with Children’s Day offers - Audio Stories, a world of imaginations to explore!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"chikupiku","offers":[{"title":"1 Month","offer_id":41919465095228,"sku":"digital-synth","price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"1 year","offer_id":41919465127996,"sku":"digital-synth","price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Audio_only.webp?v=1759207986"},{"product_id":"environment-stories","title":"December Issue 2025 | कच कच कचरा | डिसेंबर 25 अंक","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eकचऱ्याचा खूप मोठा प्रश्न सध्या संपूर्ण जगासमोर आहे हाच विषय या अंकातून मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत.  कचरा' या विषयाबद्दल मुलांच्या मनात कुतूहल, प्रश्न निर्माण व्हावेत, त्यांनी त्यांचे-त्यांचे उपाय शोधावेत, कुणीतरी सांगतंय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्यापेक्षा त्यामागचं कारण समजून घेऊन ते करावं हा या अंकामागचा उद्देश. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंकात टाकाऊ वस्तूंमधून वैज्ञानिक खेळणी बनवणाऱ्या पद्म श्री अरविंद गुप्ता ह्यांची गोष्ट आहे. आपल्या घरातून गेलेल्या कचऱ्याचं पुढे काय होतं? याची चित्रगोष्टसुद्धा आहे. बाकी गोष्टी गाणी आणि activities सुद्धा नक्की बघा.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43717953454140,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Dec-ank-25-new-product-images_1.jpg?v=1780376715"},{"product_id":"early-learning-books-for-kids","title":"January Issue 2026 | इल्लु इल्लु पिल्लू | poems \u0026 stories for Kids","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूची नवीन वर्षाची सुरुवात \"इल्लु इल्लु पिल्लू\" या अंकाने करत आहोत. नवीन जन्माला आलेली, छोटे छोटे हात पाय हलवणारी, सगळं रडून सांगणारी आणि गुडूप झोपणारी तान्ही बाळं सगळ्यांनाच आवडतात. या अंकात आपण माणसांच्या, प्राण्या-पक्ष्यांंच्या आणि झाडांच्या बाळांना भेटणार आहोत. \"इल्लु इल्लु पिल्लू\" असा विषय असणाऱ्या अंकात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सरिता पदकी आणि संदीप खरे या नामवंत कवींच्या कविता आहेत. कितीही मोठी झाली तरी मुलं आई - बाबांसाठी पिल्लंच असतात या अंकाच्या निमित्ताने आपल्या मुलांना ती इल्लू टिल्लू असतानाच्या गमती सांगू या, जुने फोटो बघू या. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा गोड गोड अंक नक्की वाचा. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43812852236348,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/Jan-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376871"},{"product_id":"birthday-special-marathi-kids-stories","title":"ChikuPiku 7th Birthday |फेब्रुवारी अंक | February Issue 2026","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eफेब्रुवारी महिना चिकूपिकूसाठी खास आहे, कारण हा आहे \u003cstrong\u003eBirthday Month\u003c\/strong\u003e.\u003cbr\u003eयावर्षी चिकूपिकू ७ वर्षांचं होत असून त्यानिमित्ताने हा खास “\u003cstrong\u003e७ वा वाढदिवस स्पेशल\u003c\/strong\u003e” अंक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eसात म्हटलं की आठवतात सात रंग, सात सूर, सात वार आणि अनेक मजेशीर गोष्टी !! अशाच सात या अंकाची मजा सांगणाऱ्या गोष्टी आणि गमती या अंकात आहेत.\u003cbr\u003e\u003cbr\u003eया अंकात मुलांना वाचायला आणि ऐकायला मिळेल \u003cbr\u003e\u003cbr\u003e– “वेडात मराठे वीर दौडले सात” या गाण्यामागची गोष्ट\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eसात स्वर आणि सात वार यांवर आधारित मजेशीर गाणी\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमुलांसाठी खास तयार केलेल्या धमाल activities\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eसात रंग आणि सात स्वरांप्रमाणेच आनंद, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची गंमत घेऊन चिकूपिकू दर महिन्याला तुमच्यापर्यंत येत राहील.\u003cbr\u003e\u003cbr\u003eहा खास ७ वा वाढदिवस स्पेशल अंक नक्की वाचा आणि चिकूपिकूचा हा आनंदी प्रवास तुमच्या मुलांसोबत साजरा करा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":43951104196668,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/feb-ank-26-new-product-images_1.jpg?v=1780376797"},{"product_id":"secret-ank-march-issue-2026","title":"March Issue 2026 | ओळखा गुपित ओळखा | मार्च अंक","description":"\u003cp\u003eसिक्रेट आहे !! कुणाला सांगू नको.\u003cbr\u003eया एका वाक्यात किती गोड निरागसपणा, उत्सुकता दडलीये !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्च महिन्याच्या चिकूपिकू अंकात आपण मुलांच्या गुपितांच्या दुनियेत डोकावतोय. छोट्या छोट्या सिक्रेट्सची गंमत, लपलेला खजिना, गुप्त संदेशांची भाषा, जुन्या चित्रांत सापडलेली रहस्यं, अशा अनेक रोमांचक गोष्टी या अंकात आहेत. पण याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची आहे की सगळी गुपितं जपायची नसतात. काही गुपितं मोठ्यांना सांगणं खूप आवश्यक असतं. मुलांशी सुरक्षिततेबद्दल सहज संवाद सुरू करण्यासाठी हा अंक नक्की वाचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया अंकात आहेत :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगुप्त संदेश आणि रहस्यांच्या गोष्टी\u003cbr\u003eलपलेला खजिना आणि शोधमोहीम\u003cbr\u003eमंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या गोड कविता\u003cbr\u003eचित्रांवर आधारित भन्नाट activities\u003cbr\u003eपालक-मुलांसाठी संवादाची नवी दारं उघडणारा आशय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांच्या डोळ्यातली चमक जपा…\u003cbr\u003eआणि त्यांच्याशी “सिक्रेट्स” बद्दल मनमोकळ्या गप्पा मारा.\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44040193507388,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/march-ank-new-product-image_2.jpg?v=1780376012"},{"product_id":"sutti-special-ank-april","title":"April-May 2026 | कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या उन्हाळी सुट्टीला आणखी मजेदार आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी चिकूपिकू घेऊन आलं आहे खास \u003cb\u003e“कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक २०२६” \u003c\/b\u003eकान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा ह्या पंचेंद्रियांची जादू ह्या अंकातून मुलांपर्यंत पोहोचवतोय. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e14 गाणी, 10 गोष्टी, 18 ऍक्टिव्हिटीज, 7 कोडी आणि खेळ, 2 चित्र गोष्टी \u003c\/strong\u003eअसा सुट्टीभर पुरेल असा अंक तयार केला आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cb\u003eया अंकात काय खास?\u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e“करके देखो” - मुलांना सेन्सेस वापरून करता येतील अशा ऍक्टिव्हिटीज आणि खेळ \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eबबली कैरीची मजा, आवाजांची गंमत ह्या कविता, गाणी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eतिखट नाक असलेली आजी, आईचा तिसरा डोळा अशा भन्नाट गोष्टी \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eछान छान कविता \u003c\/b\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eगुंडेराव गडबडे - मंगेश पाडगांवकर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआवाजांची गंमत - अरुणा ढेरे \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eआम्ही आकाश बघू - शोभा भागवत \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eछुटी ओ भाई - रवींद्रनाथ टागोर \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eQR कोडवरून या कविता ऐकत धमाल करा!\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cb\u003eहा अंक का घ्यावा?\u003c\/b\u003e\u003cbr\u003eमुलं आजूबाजूचं जग कसं ओळखतात? पंचेंद्रियांमुळे. \u003c\/span\u003e\u003cb\u003e\u003c\/b\u003e\u003cspan\u003eहे सगळे अनुभव, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी महत्वाचे आहेत. वेगाने चाललेल्या आपल्या आयुष्यात ५ सेन्सेसचा अनुभव आणि मज्जा मुलांपर्यंत कुठे पोचते? \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e \u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eचिकूपिकूने ह्या अंकातून असे जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे !   \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":44161651114044,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/April-May-ank-26-product-images1.jpg?v=1775631175"},{"product_id":"july-issue-2026","title":"July Issue 2026 |भू भू स्पेशल| जुलै अंक","description":"\u003cp\u003e\"भू भू\" म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं!\u003cbr\u003eकुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसून अनेक मुलांचा जिवलग मित्र असतो. त्याच प्रेम, निरागसता, प्रामाणिकपणा आणि खोडकर स्वभाव मुलांना खूप भावतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिकूपिकूच्या जुलै महिन्याच्या “भू भू स्पेशल\" या विशेष अंकात मुलांसाठी आहेत, कुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से, कविता, सुंदर चित्रं आणि रंजक माहिती. रस्त्यावरच्या कुत्र्यांबद्दलची भीती कशी कमी करायची, त्यांच्याशी कसं वागायचं आणि कुत्र्यांच्या जगात डोकावण्याची मजा—हे सगळं या अंकातून अनुभवता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभू भू वर प्रेम करणाऱ्या आणि प्राण्यांविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हा खास अंक!\u003c\/p\u003e","brand":"ChikuPiku","offers":[{"title":"Default Title","offer_id":45738912809020,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0591\/7530\/5276\/files\/july-ank-26-cover-product-image.webp?v=1782881956"}],"url":"https:\/\/chikupiku.com\/collections\/magazine.oembed?page=2","provider":"ChikuPiku","version":"1.0","type":"link"}