-
तुमचे विचार निश्चित असू द्या. माझ्याशी बोलताना तुम्ही ठामपणे बोला. तसं झालं की मला सुरक्षित वाटतं.
-
मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तेव्हा मला धुडकावून लावू नका. तुम्ही तसं केलंत तर माझे प्रश्न बंद होतील आणि मी उत्तरं दुसरीकडून कुठूनतरी मिळवीन.
-
चारचौघांदेखत मला माझ्या चुका दाखवू नका, तुम्ही मला एकट्याला बाजूला घेऊन समजावलेत तर ते मला चांगलं समजेल.
-
माझ्या सारखं मागे लागू नका. तसं केलंत तर मला ऐकूच येत नाही असं मी दाखवीन.
-
मला वाईट सवयी लागू देऊ नका. वाईट सवयी लागत असल्या तर तुम्हीच लक्ष ठेवा आणि त्या लगेच मोडून काढा. मी त्यासाठी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
-
माझे फार लाड करू नका. मी मागीन ते मला मिळालंच पाहिजे असं मला वाटत नसतं, फक्त मी तुमची परीक्षा घेत असतो.
-
मी आहे त्यापेक्षा लहान आहे, असं समजून मला वागवू नका. मला मग मूर्खासारखं ‘मोठं असल्यासारखं’ वागावं लागतं.
-
माझ्या चुका म्हणजे जणू काही पापच आहे असं मला वाटू देऊ नका. त्यामुळे माझा मूल्यांवरचा विश्वास उडेल.
-
मला प्रयोग करायला आवडतात हे विसरू नका. मला त्याशिवाय राहवतच नाही. तेव्हा कृपया माझे प्रयोग सहन करा.
-
माझ्या बारीक-सारीक तक्रारींकडे फार लक्ष देऊ नका कारण तुम्ही माझ्याकडे लक्ष द्यावं एवढ्यासाठीच त्या असतात.
-
कधी असं तर कधी तसं, असं विसंगत बोलू नका. तुमच्या बोलण्यात सुसंगती असू द्या. नाहीतर माझा गोंधळ उडतो आणि तुमच्यावरचा विश्वासही.
-
मी जे करीन त्याचे परिणामही मला भोगू द्या. कधी-कधी अशाही मार्गानं शिक्षण होतं ते हवंच असतं.
-
तुम्ही कधीच चुकत नाही, असं चुकूनही मला सांगू नका. मग तुमचं चुकलं की मला फार मोठा धक्का बसतो.
- मी किती वेगानं वाढतो आहे हे विसरू नका. माझ्या वाढण्याच्या वेगाशी जुळवून घेणं कठीण जातं पण प्रयत्न करा.
- तुमची तब्येत निरोगी ठणठणीत ठेवा. मला तुमची खूपच जरूरत आहे.

Shobha Bhagwat
बाल आणि पालक शिक्षण तज्ञ, लेखिका
संचालिका, गरवारे बालभवन
पत्र खूपच छान आहे सुटसुटीत लिखाण
अत्यंत उपयुक्त ठरेल.
Khup chan ani vastvashi samya aslele ahe. Kharach mulanchi chuk hou naye mhanun apan prayatna karto pan tyamule chuk zali tr sudharaychi kashi he kalat nahi.
अतीशय उत्तम विचार.
मला विचार आवडले.
खूप छान आणि उपयुक्त विचार आई बाबांसाठी
हृदयाला भिडणारी भाषा…..
Mi vedant khup mja aali jastit jast online madhe
खूप सुंदर लिहिले आहे.
मुलांच्या साधारणपणे काय भावना आणि अपेक्षा असतात हे अगदी सहज आणि सुलभ शब्दात मांडले आहे.
फारच छान आणि उत्तम लिहिलं आहे
खूप छान सांगितलं आहे.
खूपच बोधक