ChikuPikuChikuPikuChikuPiku

प्रत्येकाच्या मेंदूत आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. काही बुद्धिमत्ता ठळक तर काही फिकट असतात. मुलांच्या आवडी-निवडी आणि निरीक्षणांतून या बुद्धिमत्तांची झलक
नक्की दिसते. काही मुलं खेळात रमतात तर काही चित्रांमध्ये. काही आवडीने अभ्यास करतात तर काहींना एका जागी बसायचा कंटाळा येतो. काहींना गाणी ऐकायला
आवडतं तर काही मुलं सतत काहीतरी उद्योग करत असतात.

चिकूपिकूच्या अंकांमधून या बुद्धिमत्तांचे सोपे अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपल्याला मुलांमधली खरी हुशारी शोधता आली तर अनेक
गोष्टी सोप्या होतील.
अभ्यासाची पद्धत, खेळ, छंद या सगळ्यांचं प्लॅनिंग करता येईल.

प्रत्येकाच्या मेंदूत आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. काही बुद्धिमत्ता ठळक तर काही फिकट असतात. मुलांच्या आवडी-निवडी आणि निरीक्षणांतून या बुद्धिमत्तांची झलक नक्की दिसते. काही मुलं खेळात रमतात तर काही चित्रांमध्ये. काही आवडीने अभ्यास करतात तर काहींना एका जागी बसायचा कंटाळा येतो. काहींना गाणी ऐकायला आवडतं तर काही मुलं सतत काहीतरी उद्योग करत असतात.

चिकूपिकूच्या अंकांमधून या बुद्धिमत्तांचे सोपे अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आपल्याला मुलांमधली खरी हुशारी शोधता आली तर अनेक
गोष्टी सोप्या होतील.
अभ्यासाची पद्धत, खेळ, छंद या सगळ्यांचं प्लॅनिंग करता येईल.

भाषिक बुद्धिमत्ता (Linguistic Intelligence)

ज्यांना भाषा हवी तशी वळवता येते. जी माणसं लेखन-वाचन करायला किंवा संवाद साधायला कायम उत्सुक असतात, त्या सर्वांमध्ये भाषिक बुद्धिमत्ता असू शकते. लहान मुलं केवळ ऐकून भाषा शिकतात. १ ते ८ वयोगटात जितकं भाषा समृद्ध वातावरण त्यांना मिळेल तितका भाषा विकास चांगला होऊ शकतो. गोष्टी ऐकून, वाचून, भाषा ज्ञान चांगल्या प्रकारे होऊ शकते.

गणित - तार्किक बुद्धिमत्ता (Mathematical/Logical Intelligence)

गणित म्हणजे तर्क. सगळ्या घटकांचा विचार करून, पद्धतशीर, पायरी-पायरीने गणित सोडवावे लागते. अशीच पद्धत आयुष्यातल्या समस्या सोडवताना वापरावी लागते. गणितज्ञ्, अभियंते, आर्किटेक्चर यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. तर्क बुद्धी सांगून शिकवता येत नसली तरी लहान वयात छोट्या-छोट्या कोड्यांमधून, टास्क्समधून आणि संवादातून मुलांना या बुद्धिमत्तेचे अनुभव देता येतील.

संगीत विषयक बुद्धिमत्ता (Musical-Intelligence)

संगीत ऐकायला सगळ्यांना आवडतं. पण ज्यांना ताल, ठेका सहज समजतो त्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. काही मुलांमध्ये ही चुणूक दिसून येते. त्यांचा कान तयार असतो. आपल्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या भाषेतील गाणी, वाद्य संगीत मुलांबरोबर आपणही ऐकायला हवं. तालावर ठेका देत नाचायला हवं. त्यातून मेंदूला आणि मनाला नक्की तजेला मिळेल.

शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता (Bodily/Kinesthetic Intelligence)

ही बुद्धिमत्तेमुळे शरीराचा योग्य वापर करता येतो. बॅटने बॉल मारताना किती वेगाने, कास बॉल येतोय? याचा अंदाज घेऊन मेंदू बॉल कसा मारायचा हे ठरवतो. आणि शरीरातल्या स्नायूंची तशी हालचाल होते. खेळाडूंमध्ये ही बुद्धिमत्ता असतेच तसंच नर्तक आणि वादकांमध्येसुद्धा ही बुद्धिमत्ता असते कारण शरीराच्या स्नायूंचा नियंत्रित वापर त्यांना करायला लागतो. वयवर्षे ८ पर्यंत मुलांनी भरपूर खेळायला हवं, शारीरिक विकासासाठी खेळ अत्यावश्यक आहे.

आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता (Inter-personal Intelligence)

इतरांशी चांगला संवाद साधता येणाऱ्या लोकांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. उत्तम लीडरशीप त्यांना करता येते. टीम तयार करून वेगवेगळे उपक्रम राबवणे, पुढाकार घेणे ही बुद्धिमत्ता असणाऱ्यांना सहज शक्य होते. समाजात वावरताना ही बुद्धिमत्ता अत्यंत गरजेची आहे. मुलांशी आपला संवाद कसा आहे, शाळेत /परिसरात मुलांना कसे अनुभव मिळतात यावर या बुद्धिमत्तेचा विकास अवलंबून असतो. गोष्टींमधून, मुलांशी सहज मारलेल्या गप्पांमधून यासगळ्याची सुरवात होऊ शकते.

व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता (Intra-personal itelligence )

काही व्यक्ती स्वतःच्या विचारात गर्क असतात. घटनांचा, परिणामांचा विचार करून नवीन शोध लावतात. शास्त्रज्ञ, संशोधक, विचारवंत यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. काही मुलं फारसं बोलत नाहीत पण त्यांचा स्वतःशी संवाद सुरु असतो. आपलं मुलं कसं आहे हे ओळखून त्याला वैचारिक स्वतंत्र देणं गरजेचं आहे.

निसर्गविषयक बुद्धिमत्ता (Naturalistic Intelligence)

निसर्गात रमायला सगळ्यांना आवडतं. पण काही लोकं निसर्गातल्या घटकांविषयी अगदी संवेदनशील असतात. प्राणी, पक्षी, झाडं यांविषयी त्यांना खरी माया असते. मुलांच्या आणि आपल्याही मनात निसर्गाविषयी कृतज्ञता असायला हवी.

दृश्य अवकाशीय बुद्धिमत्ता (Spatial/Visual Intelligence)

म्हणजे अवकाशाचा विचार करणारी बुद्धिमत्ता. इथे अवकाश म्हणजे अंतराळ नाही तर कुठलीही मोकळी जागा. चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्ट यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. चित्रं, कागदकाम, कातरकामा अशा गोष्टींमधून मुलांना या बुद्धिमत्तेचे अनुभव देता येतील. त्यासाठी मोठ्यांनी त्यांच्याबरोबर या ऍक्टिव्हिटीज करायला हव्यात. दहावीनंतर विज्ञान विषयाची आवड नसतानाही काही मुलं विज्ञान शाखेत प्रवेश घेतात पण तिथे रमत नाहीत कारण त्याविषयातली बुद्धिमत्ता त्यांच्यात फिकट स्वरूपात असते हे लक्षात घ्यायला हवं. आहेत, हे शोधून काढायला हवं. तरंच आपल्या मेंदूच्या हुशारीचा वापर होईल आणि त्यातून आनंदही मिळेल. लहानमुलांना या सगळ्या बहुरंगी बुद्धिमत्तांचे अनुभव सहजपणे मिळायला हवे.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page