
Chikupiku International Pack
परदेशात राहणाऱ्या सगळ्या छोट्या दोस्तांसाठी आणि त्यांच्या आई-बाबांसाठी आम्ही घेऊन आलोय खास लहान मुलांसाठीचं मॅगझीन ‘चिकूपिकू’.
- मराठीची गोडी लागण्यासाठी मराठी गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीजचा भरपूर खजिना म्हणजे चिकूपिकू!
- मुलांनी आणि पालकांनी एकत्र वाचत, धमाल करण्याची संधी देणारं मॅगझीन म्हणजे चिकूपिकू!
- मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा कॅनव्हास म्हणजे चिकूपिकू!
चिकूपिकू हे अगदी लहान मुलांचे पहिलेच मराठी मासिक आहे! भरपूर चित्रमय, मराठी गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीज, हातांनी करून बघण्याची सोपी खेळणी चिकूपिकूमध्ये आहेत. चिकूपिकूमधल्या गोष्टी एकत्र वाचताना आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतील, नकळत मराठीशी सुंदर नातं जुळवतील!!
चिकूपिकूचे अंक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील ?
पुण्याच्या मुख्य ऑफिसमधून चिकूपिकूचे सेट आम्ही आमच्या परदेशातल्या सेंटर्सना पाठवू आणि तिथून लोकल पोस्टाद्वारे सेट तुमच्याकडे घरपोच येतील. ऑर्डर दिल्यापासून अंक घरपोच मिळायला अंदाजे अंदाजे २० दिवस लागू शकतील. सध्याच्या करोना निर्बंधांच्या काळात आम्ही शक्य तेवढ्या लवकर अंक पोहोचतील असा प्रयत्न करत आहोतच.