



M.R.P. ₹200.00
मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ऍक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.
514 in stock
दिवाळीचं वातावरण म्हणजे डोळ्यासमोर येतात उटणं, फराळ, कंदील, पणत्या आणि याचबरोबरच दिवाळी अंकसुद्धा! मराठीतली आपली ही विशेष वाचन-परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने चिकूपिकूचा हा दिवाळी विशेषांक, १ ते ११ मधल्या छोट्या मुलांसाठी काढला आहे. मुलांची दिवाळीची सुट्टी चिकूपिकूबरोबर आणखी स्पेशल होईल.

दिवाळीचं वातावरण म्हणजे डोळ्यासमोर येतात उटणं, फराळ, कंदील, पणत्या यांबरोबरच दिवाळी अंकसुद्धा. मराठीतली आपली ही विशेष वाचन-परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यातली गोडी दाखवणं हे महत्त्वाचं आहेच पण खरं तर ते आपल्यासाठी तेवढंच आनंददायीसुद्धा असणार आहे. याच उद्देशाने चिकूपिकूचा हा दिवाळी विशेषांक आहे. १ ते ११ मधल्या छोट्या मुलांसाठी. काय आहे या विशेषांकात …? मुलांची दिवाळीची सुट्टी चिकूपिकूबरोबर नक्कीच थोडी आणखी स्पेशल होईल.

चिकूपिकू वार्षिक सबस्क्रिप्शन
या दिवाळी अंकासह वर्षभर प्रत्येक महिन्याला
1 असे एकूण १0 अंक घरपोच.
1 असे एकूण १0 अंक घरपोच.

चिकूपिकू दिवाळी अंक
धमाल गोष्टी, गाणी आणि हटके
ऍक्टिव्हिटीज असलेला विशेषांक!
ऍक्टिव्हिटीज असलेला विशेषांक!


दिवाळी अंकाची थीम आहे खा-खा खाऊ
प्रत्येक मुलाचा आवडणारा असा खाऊ असतोच असतो. या खाऊच्या अनेक आठवणी आणि किस्से मुलांच्याच नाही तर आपल्या भावविश्वातसुद्धा असतात. म्हणूनच ‘चिकूपिकू’ने हा खाऊ विशेषांक खास मुलांसाठी आणि त्यांच्या आईबाबांसाठी तयार केला आहे.

खाऊच्या गोष्टी, गाणी, अँक्टिव्हिटीज आणि किस्से, खाऊबद्दलचे प्रश्न यामध्ये मुलं रमली तर हे सगळं करता करता मुलं खायलाही लागतील.

मोबाईलमध्ये मुलांना अडकवून खायला देण्यापेक्षा गोष्टी वाचून, गाणी ऐकवून छान खायला घालू या. आनंदात खायला घालू या म्हणजेच बुद्धी आणि भावनांचंसुद्धा पोषण होईल.
१ ते ११ वयोगटातील मुलांसाठी काय आहे या विशेषांकात?
मुलांना आवडतील अशा गोष्टी, काही जुन्या – काही नवीन पण म्हणताना हमखास मजा येईल अशा कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ऍक्टिव्हिटीज!
दिवाळी अंकाची झलक
गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीज भरपूर चित्रं असलेला हा दिवाळी अंक मुलांकडे हवाच!
मुलांचा आणि आई-बाबांचा अंक

Amazing Magazine! Loved it!
चिकूपिकू येती घरा, तोची आमुचा चेहरा हसरा. दिवसभर रेवाला लाभतो चिकूपिकू आणि आजी-आबांचा सहवास. आणि रात्र होते आईच्या कुशीत चिकूपिकू सोबतच. या काळात जेव्हा बाहेर खेळायला जाता येत नाही, तेव्हा चिकू, पिकू, मिकू, बागुलबुवा, छबी, क्युबो हेच रेवाचे सवंगडी.
Mr. Mahesh Joshi
Verified Purchase



Beautiful stories & activities
आम्ही दर महिन्याला पोस्टमनकाकांची वाटच पाहात असतो. अंकातली चित्रं खूप सुंदर आणि भाषा अगदी सोपी आहे. चिकूपिकूने वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आम्ही अंक सारखे-सारखे वाचतो तरी तितकीच मज्जा वाटते.
Mrs. Janhavi Kulkarni
Verified Purchase

