अडम तडम गडम
₹150.00
लहानपणी मुलांना झोपवताना, खाऊ भरवताना, खेळताना.. सगळीकडे सोबत असते गाण्यांची, बडबडगीतांची. सोपे शब्द, सोपी वाक्यं आणि गोंडस अर्थ असलेली बालगीतं मुलांच्या सहज लक्षात राहतात.आईबाबादेखील अगदी लहानपणापासून अशी बालगीते ऐकत आलेले आहेत. अशा नेहेमीच्या गाण्यांमध्ये नवीन छानशी भर घालायला एक सुंदर पुस्तक तुमच्या भेटीला आणत आहोत!
कवी विद्याधर शुक्ल यांच्या सहज-सोप्या आणि सुंदर लेखनशैलीतून साकारलेलं हे बालगीतांचं पुस्तक – अडम तडम गडम !!
यात भरपूर गंमतगाणी आहेत. बेडूकदादा, माऊ-चिमणीशी गप्पा, जंगल, वारा, घरातल्या भांड्यांची गडबड, मामाचं-खाऊचं गाव, मुलांना पडणारे सहज प्रश्न आणि अशा भरपूर गमतीजमती दडल्या आहेत. आताच्या लहान मुलांना ही नव्या रुपात साकारलेली गमतीदार बालगीतं नक्की आवडतील. ही बालगीतं म्हणता म्हणता नवे शब्द समजतील, एखादी कविताही सुचेल आणि सोबतच या प्रत्येक बालगीतासह दिलेली अॅक्टिव्हीटी करून बघताना अजून मज्जा येईल.
मुलांसह ही बालगीतं म्हणू या, पाठ करू या, चित्रं बघू या आणि बालपणीचा हा सुखद काळ नव्या बालगीतांसह पुन्हा अनुभवू या !
136 in stock
भरपूर गमतीजमती दडलेल्या कवी विद्याधर शुक्ल यांच्या सहज-सोप्या आणि सुंदर लेखनशैलीतून साकारलेलं हे बालगीतांचं पुस्तक - अडम तडम गडम !!
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
ISSN | RNI TC No. MAHBIL10083 |
No. of Pages | 48 |
Binding | Paperback |
Reviews
There are no reviews yet.