मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.
₹ 200/-

मोठ्यांना दिवाळीची भरपूर तयारी, कामं असतात पण लहान मेम्बरसुद्धा काही कमी बिझी नसतात. त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीची भरपूर कामं असतात. आणि मुलांचं काम म्हणजे काय .. तर खेळ, गोष्टी, ऍक्टिव्हिटीज आणि मज्जा. या सगळ्यात त्यांच्या जोडीला येतो चिकूपिकू दिवाळी विशेषांक.
दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!

मोठ्यांसाठी बरेच दिवाळी अंक असतात पण खास छोट्या मुलांना विचारात घेऊन चिकूपिकूचा हा दिवाळी अंक तयार केला आहे. सोप्या भाषेतल्या गोष्टी, गाणी, चित्रं, हटके ॲक्टिव्हिटीज असलेला हा अंक मुलं आणि आई-बाबा एकत्र वाचू शकतील.

₹200

मोठ्यांना दिवाळीची भरपूर तयारी, कामं असतात पण लहान मेम्बरसुद्धा काही कमी बिझी नसतात. त्यांना पण दिवाळीच्या सुट्टीची भरपूर कामं असतात. आणि मुलांचं काम म्हणजे काय .. तर खेळ, गोष्टी, ॲक्टिव्हिटीज आणि मज्जा. या सगळ्यात त्यांच्या जोडीला येतो चिकूपिकू दिवाळी विशेषांक.
दिवाळीच्या सुट्टीसाठी सगळ्या मुलांकडे असायलाच हवा असा हा चिकूपिकू दिवाळी विशेषांक!
या वेळच्या दिवाळी विशेषांकाची थीम आहे ‘अंधार – उजेड’
दिवाळीच्या निमित्ताने अंधाराची भीती घालवून एक वेगळी ओळख मुलांना करून देऊ या. अंधारातले प्राणी, अंधार-प्रकाश यांचं नातं, सावल्यांचे खेळ, शिवाजी महाराजांची अंधारातली मोहीम, अंधारात चमकणारे जीव अशा भरपूर गोष्टी अंकात आहेत. याशिवाय यात काय काय आहे माहितीये ..? इतर मजेदार गोष्टी आणि किस्से, प्रत्येक पानावर सुंदर रंगीत चित्रं, भरपूर ॲक्टिव्हिटीज, कोडी, कविता, हातांनी करून बघण्याची खेळणी, चित्रकला, कोलाजकाम, मातीकाम, रेसिपी, ऑडिओ स्टोरीज… यादी न संपणारी आहे!
मुलांना चॉकलेट्स, खेळणी आपण नेहमीच घेऊन देतो, दिवाळी विशेषांकाची ही भेट आपल्या मुलांबरोबरच त्यांच्या मित्रांना, बहीण-भावांना आवर्जून देऊ या.