fbpx

चिकूपिकू जून २०२३ अंक

100.00

जून महिन्याच्या अंकाचा विषय आहे ‘शाळा’.  ‘शाळेचा पहिला दिवस’ या तीन शब्दांत किती तरी भावना, आठवणी, नाट्य, हसू आणि अश्रू भरलेले आहेत ना! आपल्या शाळेचा पहिला दिवस ते आता आपल्या मुलांच्या शाळेचा पहिला दिवस हा खूप मोठा प्रवास करून आपण आलो आहोत.
अंकाच्या कव्हरवर शाळेच्या तयारीची गडबड आहे जी बराचश्या घरात नक्की बघायला मिळते. अंकाच्या आत शाळेचे बाकी पैलू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा कशा असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आई-बाबा आणि मुलं एकत्र मिळून वाचू शकतील अशा गोष्टी, गाणी, ऍक्टिव्हिटीज, चित्रांची मजा अंकात आहे.

 

355 in stock

Description

शाळेतल्या शिक्षकांचा खूप मोठा प्रभाव मुलांवर असतो. “मला अमुक ताई/टीचर  खूप आवडतात. आज ताई असं म्हणाल्या.” अशा वाक्यांमधून ते जाणवतं. या अंकात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, गिजुभाई बधेका अशा मुलांवर अतोनात प्रेम करणाऱ्या शिक्षकांच्या आणि त्यांच्या प्रयोगशील शाळांच्या गोष्टी आहेत. रेणुताई गावस्कर यांनी पालकांसाठी लिहिलेला लेख आवर्जून वाचावा असा आहे.
या अंकासोबत शाळेच्या नवीन वर्षाची छानशी सुरुवात करू या.

चिकूपिकू जून २०२३ अंक
शाळेची सुरवात म्हणजे गडबड, धाकधूक, कुतूहल आणि मजा
या अंकासोबत शाळेच्या नवीन वर्षाची छानशी सुरुवात करू या!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू जून २०२३ अंक”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop