fbpx

चिकूपिकू मार्च अंक २०२३

100.00

मुलांना हवेत उडणारे, फुलांवर बसणारे, रंगीबेरंगी, नक्षीदार फुलपाखरं खूप आवडतात. चिकूपिकूचा हा मार्च महिन्याचा अंक याच सुंदर सुंदर फुलपाखरांची गट्टी करवणारा आहे. फुलपाखरांच्या अनेक गमती, गोष्टी आणि किस्से सांगणारा आहे. आजवर ‘Nature आणि मी’ या सदरातून निसर्गमित्र धर्मराजने आपल्याला निसर्गातल्या अनेक कमाल गोष्टी सांगितल्या. आई-बाबा आणि मुलांमध्ये निसर्गाविषयी कुतूहल निर्माण केले, निसर्गावर प्रेम करायला शिकवले. झाडं, प्राणी, पक्षी, कीटक आणि पर्यावरणातल्या अनेक गमतीजमती सांगितल्या. धर्मराजच्या या निसर्गविषयक आपुलकीचा, कामाचा हा प्रवास कायम ठेवत आजही धर्मराजचे अनेक मित्र चिकूपिकूद्वारे मुलांपर्यंत पर्यावरणातल्या अनेक गोष्टी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे खूप खूप आभार. आई-बाबांनी मुलांना हा अंक नक्की वाचून दाखवावा. एक छोटोसा जीव असणारं पण निसर्गाच्या साखळीतलं अत्यंत महत्वपूर्ण असं हे ‘फुलपाखरू’ किती महत्वाचं आहे हे देखील मुलांना नक्की सांगावं.
मुलांच्या मनात निर्माण झालेला हा निसर्गाविषयीचा स्नेहबंध असाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करत राहू या, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला जपू या, हे प्रेम असेच वाढवत राहू या.

179 in stock

मार्च अंकातून भेटायला येत आहेत भरपूर रंगीबेरंगी फुलपाखरं! आम्ही हा अंक सप्रेम अर्पण करत आहोत धर्मराज पाटील या पक्षी आणि फुलपाखरांच्या मित्राला. 'Nature and मी' या सदरातून धर्मादादाने सांगितलेल्या प्राणी-पक्षी आणि निसर्गाच्या गोष्टी अगदी खास होत्या. (स्मृतिदिन - १ मार्च)

 

Additional information

Age Group

1+

Language

Marathi & English

No. of Pages

40

Binding

Paperback

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चिकूपिकू मार्च अंक २०२३”

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop