ChikuPiku Storybook Pack of 6 (गोष्टीची पुस्तके)
₹599.00
बालदोस्तांकरता आम्ही घेऊन आलो आहोत चिकूपिकूच्या निवडक ६ मासिकांचा संच. मुलं आणि पालक अशा दोघांनाही मिळून वाचायला खूप मज्जा येईल अशा धम्माल गोष्टी, गाणी, भन्नाट कोडी, मोठ्ठाली रंगीत चित्र आणि भरपूर अॅक्टिव्हीटीज असलेल्या या संचात दिवाळी आणि सुट्टीविशेषांक असे २ जोडअंकसुद्धा आहेत. खा-खा खाऊ, पक्षी, कुटुंब, वाढदिवस, हास्य आणि साहस अशा विविधरंगी थीमवर आधारित या मासिकांचा हा संच छोट्या बालदोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल.
चिकू-पिकू मासिकाच्या अंकांची मांडणी मुलं आणि आई-बाबा यांचा विचार करून केलेली आहे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून, मुलांना योग्य प्रकारे engage करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. अंकातील गोष्टी मुलांना मोठ्याने वाचून दाखवूयात. मुलं गोष्टींमध्ये रमतात आणि आई-बाबांशी नव्याने जोडली जातात. मासिकातल्या activities मुलांसोबत आपणही करूयात.
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
ISSN | RNI TC No. MAHBIL10083 |
Binding | Paperback |
Reviews
There are no reviews yet.