चिकूपिकू सुट्टी विशेषांक : एप्रिल + मे २०२३
$2.65
चिकूपिकूचा सुट्टी विशेषांक म्हणजे एप्रिल-मे दोन महिन्यांचा मिळून मोठा जोड-अंक. मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक! या अंकाचा विषयसुद्धा आम्ही खूप खास निवडला आहे. भारत! भारत देश म्हणजे नक्की काय हे क्लिष्टपणे न सांगता उमजेल अशा गोष्टींमधून भारताची सफर घडवण्याचा, ओळख करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
559 in stock
शाळेत शिकतील ती माहिती आधीच देणे असा या अंकाचा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे राजधानी, राज्ये, अर्थव्यवस्था असं काहीच या अंकात नाहीये. भारताचा इतिहास, भूगोल यात नाहीये. पण छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या देशाचा स्वभाव, अंतरंग मात्र नक्की दाखवलेलं आहे. अंकात वेगवेगळ्या भाषा, अन्नपदार्थ, सण साजरे करण्याच्या वेगळ्या पद्धती ..पण तरी त्यात सारखी असलेली मूल्यं, सारखे विचार, प्रेम, कुटुंबाचं महत्त्व हे मुलांच्या मनात नकळत रुजेल अशा गोष्टी आहेत. कविता आणि गाणीसुद्धा आहेत. बैठे, घरच्या घरी खेळता येतील असे खेळ आहेत. याशिवाय स्वतःच्या हातांनी काम करून नवीन काही बनवण्याचा आनंद मुलांना मिळेल अशा ऍक्टिव्हिटीज आहेत. तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर ही हातांची जादू नक्की अनुभवा.
मुलांना चिकूपिकूबरोबर धमाल मजेची सुट्टी देण्याचा प्रयत्न आपण करू या. त्यांच्यासोबत आपणही सुट्टीतली ही मजा पुन्हा अनुभवू या.
Additional information
Age Group | 1+ |
---|---|
Language | Marathi & English |
ISSN | RNI TC No. MAHBIL10083 |
Binding | Paperback |
१ ते ११ वयोगटातील मुलांसाठी
काय आहे या विशेषांकात?
मुलांना आवडतील अशा गोष्टी, कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ऍक्टिव्हिटीज!

चिकूपिकू वार्षिक मेंबरशीप
एकूण १० अंक घरपोच
₹1200 ₹1500

चिकूपिकू सुट्टी विशेषांक 2023
मुलांना सुट्टीत भरपूर गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीजचं खाद्य पुरवणारा सुट्टीतला दोस्त म्हणजे चिकूपिकू सुट्टी विशेषांक!