आपली मुलं | Apali Mul
₹120.00
मुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. आई-बाबांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्याची मागणी करत आहे. अशात मुलं वाढवणं हे जिकिरीचं काम न वाटता आनंदाची, स्वतःलासुद्धा समृद्ध करण्याची संधी असते हे उमजायला हवं.
3 in stock
माझं मुल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसंच कसं वागेल?
मुलांना चांगल्या-वाईटाचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. 'देणं' असं तरी कसं म्हणावं? ते त्यांना देता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं काम आहे.
आई-बाबांचा रोल निभावताना मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफुली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत.
मुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्यालाही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत-खेळत वाचताना अशी जाग नक्की येईल.
Additional information
Weight | 120 g |
---|---|
Language | Marathi |
No. of Pages | 86 |
Binding | Paperback |
Publisher | Rajhans Prakashan |
Age Group | Books for Parents |
Reviews
There are no reviews yet.