निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलूनं त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घालायची. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. खाऊनखाऊन लालू बोका चांगला गलेलठ्ठ झाला होता. खाण्यासाठी उठायचं न् खाऊन पुन्हा झोपायचं. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी.
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Products