आपल्या मुलांचे सहज सुंदर फुलत जाणारे बालपण निरखून पाहायला, आनंदक्षण वेचायला शिकवणारे पुस्तक. अगदी बाळ घरी येण्यापासून, त्याची वाढ, आहार, काळजी काय घ्यावी, खेळ कोणते खेळावे यासारख्या अनेक विषयांवरची माहिती अनुभवी बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी रंजकपणे या पुस्तकात दिली आहे. मुलांना आपण वाढवत नसून तीच आपल्याला वाढवत आहेत याचा आनंददायी प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे.
पालकत्वाचा प्रवास हा फार आनंददायी असतो, यामध्ये आपल्या मुलांच्या बाबतीत अनेक अनुभव येतात. या अनुभवांचा आनंद घेता घेता मुलं वाढवणं, त्याची काळजी घेणं, हव्या नको त्या गोष्टी बघणं, छोट्या छोट्या गोष्टी शिकणं हे यासह आलंच. याच प्रवासाची सुंदर माहिती देत देत शिकवत जाणारं हे पुस्तकं.