चिकूपिकू हे अगदी लहान मुलांचे पहिलेच मराठी मासिक आहे! मासिकातून प्रत्येक महिन्याला मुलांना आवडतील अशा मराठी गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ऍक्टिव्हिटीज मुलांपर्यंत पोहोचतात. त्यानिमित्तानं आई-बाबा आणि मुलं एकत्र क्वालिटी टाईम घालवतात.
चिकूपिकूमधला ८०% मजकूर मराठीत आणि २०% इंग्रजीत आहे. आई आणि घरातले सगळे ज्या भाषेत बोलतात ती मातृभाषा मुलांना जवळची असते, मातृभाषेत त्यांना गोष्टींचं आकलन नीट होतं. या दृष्टिकोनातून मराठीला आम्ही प्राधान्य दिले आहे.
या महिन्यात ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतल्यास सबस्क्रिप्शनचा कालावधी –सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ असा असेल. या कालावधीत ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ चा दिवाळी अंक आणि एप्रिल-मे २०२४ चा सुट्टी विशेषांक हे जोडअंक धरून एकूण १० मासिकं प्रत्येक महिन्याला घरपोच तुम्हाला मिळतील
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 इतके लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सब्स्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.*
*जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे २० रु. आकारले जातील.