fbpx

अभ्यासाचं टाईमटेबल आखलं की सोपं जातं हे मुलांना आणि आईवडिलांनाही माहीत असतं. पण ब-याचदा टाईमटेबल आखण्याचाच कंटाळा केला जातो. टाईमटेबल आखूनही जेव्हा त्यानुसार अभ्यास होत नाही, तेव्हा असं समजावं की एकतर केलेलं टाईमटेबल चुकीचं आहे किंवा आपणच केलेल्या टाईमटेबलला आपण गांभिर्याने मनावर घेत नाही.

टाईमटेबल चुकीचं का आखलं जातं, त्याचीही काही कारणं आहेत.

एक. मुलांनी खूप अभ्यास करावा म्हणून घरातल्या मोठ्या माणसांनी ते आखलेलं असतं. त्यात मुलाच्या कुवतीचा विचार नसतो. उपलब्ध वेळेचा आणी मुलाच्या मानसिक स्थितीचा विचार नसतो. म्हणजे मूल दमलेलं असेल तर त्याचा अभ्यास होणार नाही. किंवा मित्र-मैत्रिणी खेळत असतील, त्यांचे आवाज ऐकू येत असतील तर मुलांच आभ्यास होणार नाही. घरात टी.व्ही. चालू असेल/ पाहुणे असतील तर अभ्यास होणार नाही. अनेकदा तर जास्तीचा अभ्यास पालक देऊन ठेवतात; खरंतर त्यंनाही माहीत असतं की एवढा अभ्यास होणार नाहीये. पण असू दे; दिलेला बरा. अस अकाही तरी विचार करून जास्तीचा अभ्यास देऊन फायदा काहीच होणार नसतो. उलट अभ्यास करायचा राहिला आहे, याचं ओझं मनावर राहतं.

या चुका टाळण्यासाठी,
१. टाईमटेबल स्वत:च करू नये. मुलांना घेऊन करावं.
२. मुलं शाळेत आणी क्लासेसमध्ये अभ्यास करतात, तेव्हा घरच्या अभ्यासाची खरंच आवश्यकता आहे का ते बघावं. त्यानुसार आणि तेवढ्याच गोष्टींसाठी टाईमटेबल आखावं. उदा. पाढे, सूत्र, क्लिष्ट नियम आणि व्याख्या यांचं आवश्यकतेनुसार असलेलं पाठांतर. ज्या विषयात जास्त अभ्यासाची गरज आहे, तेवढाच अभ्यास.
३. गरज नसेल तर घरचा वेळ वर्तमानपत्रांचं आणि अन्य पुस्तकांचं वाचन, घरच्यांबरोबर मोकळ्या गप्पा, नातेवाईकांशी गप्पा, व्यायाम, स्वत:चं लेखन यासाठी वापरावा.
४. सुट्टीत आणि परीक्षेच्या काळात मात्र टाईमटेबल आखून त्याप्रमाणे अभ्यास करावा.

ज्यांनी आजवर कधीच असा आखून घेऊन अभ्यास केलेला नाही, त्यांनी अवश्य करून बघावा. त्यासाठी डाय-या, इयर प्लॅनर यांची मदत घ्यावी.

— सखी – लोकमत

chikupiku

डॉ. श्रुती पानसे

Ph. D. in Brain-based learning

संपादक, चिकूपिकू मासिक

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop