निलू आणि पिलू लालूचे खूप लाड करायच्या. निलून त्याला एक घास दूध-भात घातला की पिलू दोन घास घाली. छान लोणी लावलेला पाव निलूनं दिला की पिलू त्याला आपल्यातलं बिस्किट खाऊ घालायची. खाऊनखाऊन बोका चांगला गले लाल थाट होता. खाऊन उठणे पुन्हा पुन्हा उठणे. असा त्याचा कार्यक्रम होता. अशा या लालूच्या तीन गोष्टी.