QUEST ही संस्था मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून 2007 पासून कार्यरत आहे. मुलांना वाचन-लेखनाची गोडी लागण्यासाठी पुस्तकं खूप महत्त्वाची असतात. क्वेस्टने मुद्दाम विचारपूर्वक 3 ते 8 वयोगटातल्या मुलांसाठी मराठी पुस्तकं प्रकाशित केली आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही पुस्तकांत अगदी कमी मजकूर आहे – मुलांना अक्षरओळख होऊ लागली की ती स्वतःच वाचू लागतील. तुम्ही तुमच्या मुलांना ही पुस्तकं वाचून दाखवा आणि त्यांच्या सोबत मजेत वेळ घालवा.

All Book Set 21 books

₹1,275.00₹2,045.00

लहान मुलांसाठी एकवीस पुस्तकांचा हा सेट आहे. यात 2 ते 8 वर्षाच्या वयोगटासाठी पुस्तकं आहेत. काही गोष्टी आहेत, गाणी आहेत, काही पुस्तकं वर्णनात्मक आहेत. प्रत्येक पुस्तकात आकर्षक चित्रं आहेत. काही...

हट्टी वासरू

₹70.00₹110.00

वनशा रोज गायी-गुरांना चारायला जंगलात घेऊन जातो. सगळ्या गायी त्याचे ऐकतात. पण एक वासरू खूप हट्टी आहे. घरी जाण्याची वेळ झाली तरी ते हट्टाने गवत खात राहते. वनशा त्याला समजावण्याचा...

नावेच नावे

₹65.00₹100.00

एका लहान मुलीला अजून वाचता येत नाही. पण आजूबाजूच्या सर्व वस्तूंना, लोकांना आणि ठिकाणांना नावे आहेत हे जेव्हा तिला कळते, तेव्हा मोठ्या माणसांना ती त्याबद्दल खूप प्रश्न विचारते. ही सगळी...

चंपी

₹45.00₹75.00

विहा नावाच्या मुलीचे बाबा दार शनिवारी तिच्या केसांना तेल लावून देतात. पण त्यांची तेल लावण्याची पद्धत खूप मजेदार आहे. विहाला त्यांच्याकडून चंपी करून घ्यायला आवडते. गोष्टीत वेगवेगळे नादमय शब्द वापरले...

ससुल्या गडी

₹65.00₹100.00

एक ससा जंगलात फिरत असताना त्याला एक रिकामी गुहा दिसते. तो गुहेत शिरतो आणि दार लावून घेतो. ती गुहा एका वाघाची असते. वाघ परत येतो तेव्हा गुहेचे दार बंद बघून...

टेबलाखालचं जग

₹55.00₹85.00

सुमेध नावाच्या एका लहान मुलाची घरात एक आवडती जागा आहे - त्याला टेबलाखाली बसायला आवडतं. तिथून तो घरात आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना पाहतो. तिथेच तो अभ्यास करतो, खाऊ खातो, कधी...

रंगीबेरंगी बाजार

₹55.00₹85.00

ग्रामीण भागातला आठवडी बाजार म्हणजे रंगांची उधळण असते. भाजीपाला, फळे, मसाले, कपडे अशा शेकडो वस्तू या बाजाराला रंगीबेरंगी बनवतात. अशाच एका बाजारातून फिरताना टिपलेल्या फोटोंमधून हे पुस्तक तयार झाले आहे....

छत्री

₹55.00₹90.00

मालाच्या बाई आज वर्गात छत्र्या घेऊन आल्या. त्यांनी मुलांना विचारले, तुम्ही छत्रीचा वापर कसा करता? मुलांनी त्यांना छत्रीचे जे निरनिराळे उपयोग सांगितले ते ऐकून त्या चक्रावूनच गेल्या! लेखकाने आपल्या लहानपणच्या...

भाकर

₹65.00₹115.00

भाकरी हा महाराष्ट्रातील आहाराचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निरनिराळ्या प्रकारची भाकर रांधली जाते. भाकर कशी तयार होते याची गोष्ट सांगणारी ही फोटो-कथा. सातपुड्याच्या जंगलात वसलेल्या एका लहानशा खेड्यातल्या...

माझी ओळख

₹65.00₹100.00

माया तिची स्वतःची आणि तिच्या घरच्यांची ओळख करून देते आहे. तिच्या कुटुंबातल्या प्रत्येकाची निराळीच तऱ्हा आहे. तिच्या आईला वेगाने बाईक चालवायला आवडते तर काकाला मटन बिर्यानी बनवायला. मध्यमवर्गीय सुशिक्षित घरातल्या...

लहान बहीण

₹55.00₹85.00

एक मोठा भाऊ त्याच्या लहान बहिणीशी मजेशीर खेळ खेळतो. तिला पुस्तकातली चित्रं दाखवून त्यातल्या वस्तू आणून देतो. पण पुस्तकात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी तो आणू शकेल का? ते जाणण्यासाठी हे पुस्तक...

गुंतागुंती

₹45.00₹75.00

केस विंचरताना कंगव्यात खूप केस अडकतात, त्यांचा गुंता होतो. अशा तुटलेल्या केसांचा काही उपयोग असतो का? एका छोट्या मुलीला पडलेले हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या गोष्टीत वाचा. हे चित्रमय...

खेळ

₹90.00₹140.00

साहिल आणि त्याचा मित्र बागेत खेळायला गेले. साहिलने जोरात बॉल फेकला. मग काय झालं? एक साधी गोष्ट, पण मुलांना नक्की विचार करायला लावेल. हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी...

माझी पत्रावळ

₹90.00₹140.00

पत्रावळ मुलांनी कधीतरी पाहिलीच असेल. या पुस्तकात सांगितली आहे पत्रावळ कशी बनते त्याची गोष्ट. आकर्षक चित्रांनी सजलेलं हे पुस्तक ५ ते ८ वयोगटातील मुलांना नक्की आवडेल. Age group : 5...

नावात काय आहे?

₹65.00₹100.00

मीना नावाची एक छोटी मुलगी आहे. तिचं नाव मीना असलं तरी तिला घरातले सगळे वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. मीनाला त्याबद्दल काय वाटतं, हे या गोष्टीतून जाणून घ्या. आकर्षक चित्रांनी सजलेलं...

बाबा लोक

₹55.00₹90.00

लहान मुलांच्या विश्वात त्यांचे वडील खूप महत्त्वाचे असतात. या पुस्तकात मुलांच्या नजरेतून त्यांना त्यांचे बाबा कसे दिसतात, बाबा त्यांच्यासाठी काही खास करतात का, याची गोष्ट आहे. वेगवेगळ्या मुलांचे बाबा या...

अट्टू गट्टू

₹55.00₹90.00

अट्टू आणि गट्टू एकदा जंगलात फिरायला गेले. तिथे गेल्यावर त्यांना काय दिसले, काय ऐकू आले, त्यांची कशी फजिती झाली या बद्दलची ही गोष्ट. जंगलातील या सफरीवरून अट्टू आणि गट्टू परत...

मुळ्याची भाजी

₹55.00₹90.00

सोनियाला मुळयाची भाजी अजिबात आवडत नाही. एकदा तिला सगळ्या भाज्यांचं बोलणं ऐकू आलं. भाज्या काय बोलत होत्या? सोनियाने नंतर काय केलं? या मजेदार गोष्टीच्या पुस्तकात खूप छान चित्रं आहेत. ३...

पत्र

₹65.00₹100.00

पत्र लिहिणं आणि कोणाला पाठवणं हल्ली फार दुर्मिळ झालं आहे. 'पत्र' या पुस्तकात पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगितली आहे. एक लहान मुलगी तिच्या आजोबांना पत्र लिहिते. ते पत्र तिच्या घरून आजोबांच्या...

चला जाऊ पक्षी बघायला

₹45.00₹75.00

पक्ष्यांची माहिती देणाऱ्या या पुस्तकातला मजकूर म्हणजे एक छानसं गाणं आहे. वेगवेगळे पक्षी कसे दिसतात, काय करतात, ते कुठे पाहायला मिळतात अशी माहिती गाण्यातून थोडक्यात दिली आहे. जोडीला रंगीत आकर्षक...

खिशात ठेवता येईल एवढे चर्च आणि डोक्यावर घेता येईल एवढी शाळा

₹60.00₹110.00

मंटू माकडिणीला तलावाच्या पलीकडच्या काठावरचा लहानसा मोबाईलचा टॉवर हवाय - मिटलेल्या छत्रीसारखा खांद्यावर घेऊन फिरायला. तिथली लहान लहान आंब्याची झाडं हवी आहेत, कानावर लावून हिंडायला. एक दिवस आईचा डोळा चुकवून...

चिनू-मिनू

₹55.00₹90.00

चिनू आणि मिनूची छान मैत्री आहे. चिनू शाळेतून आला की रोज मिनूशी खेळतो. एक दिवस मिनू अचानक दिसेनाशी होते. आता चिनू काय करील? मिनूला शोधायला कुठे जाईल? आकर्षक चित्रांनी सजलेली...

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.