चिकूपिकूचा वापर कसा करता येईल?

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी
- चित्रं दाखवून गोष्टी सांगूया, अगदी जेवण भरवतानासुध्दा
- खडू, पेन्सिल देऊन Activities ची पानं समोर ठेवूयात. रेघोट्या ओढल्या, पान फाटलं तरी हरकत नाही
- गोष्टीतील चित्रं समोर ठेवून Audio Stories ऐकवूया

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी
- आई-बाबांबरोबर अंकातील गोष्टी वाचल्या की पुढच्या वेळी मुलं चित्रांमधून गोष्टी समजून घेतील. पुन्हा-पुन्हा अंक हाताळतील. चित्रं बघतील
- नुसती चित्रं बघून मुलंसुद्धा गोष्ट सांगू शकतील
- Activities स्वतः सोडवू शकतील

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी
- चित्ररूपी लहान-लहान गोष्टी वाचायला मुलांना आवडतील
- लहान भाऊ-बहिणीला गोष्ट सांगू शकतील
- नव्या Activities स्वतः बनवू शकतील
- चित्रं वापरून नव्या गोष्टी रचू शकतील