Promotional banner
Promotional banner

या वयात मुलांना काय हवं?

ऐकणं सर्वात आधी

ही चिमुरडी जे काही ऐकतात ते सगळं मेंदूत साठवून ठेवतात. घरी आपण मोजकेच शब्द बोलतो. ऑडिओ गोष्टींमधून भरपूर नवे शब्द मुलांच्या कानावर पडतात. त्यातून भाषाविकास वेगाने होतो.

Marathi Audio Story App

Marathi Audio Story App

₹1350 / Year

तालाची समज

छोट्या मुलांना ताल आणि ठेका खूप आवडतो. आईच्या पोटात असल्यापासून आईच्या हृदयाचे ठोके ते ऐकत असतात. बडबड गाणी एक दोनदा ऐकूनच ते गुणगुणायला लागतात. अडम तडम या पुस्तकात १८ गंमत गाणी आहेत,

Adam Tadam Gadam

Adam Tadam Gadam

₹200 / Book

चित्रातून शिकणं

चित्रं दाखवत गोष्टी सांगणं, गप्पा मारणं यातून मुलं नवं जग अनुभवतात. प्राण्यांची, पक्ष्यांची चित्रं, गोष्टी मुलांना खूप आवडतात. जशी खेळणी मुलं खेळतात तशी पुस्तकांशीही गट्टी जमली तर मेंदूतले न्यूरॉन्स कामाला लागतील.

ChikuPiku Magazine - May 2026

ChikuPiku Magazine - May 2026

₹225 / Book

चिकूपिकू सुरु केल्यावर काय होतं?

Father reading with daughter Father reading with daughter
Screen time कमी होतं

Screen time कमी होतं

जेवताना, झोपताना ऑडिओ गोष्टी, गाणी आणि पुस्तकांचा भरपूर उपयोग होतो.

मुलं expressive होतात.

मुलं expressive होतात.

गोष्टीतले शब्द आणि गाण्याचे ताल, आवाज यांचं अनुकरण मुलं करू लागतात.

शब्दसंग्रह वाढतो.

शब्दसंग्रह वाढतो.

गोष्टींमधले सोपे, अवघड शब्द मुलं सहज वापरू लागतात.

quote

Loved by Kids, Trusted by Parents 

It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can't read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. It has enriched him with amazing vocabulary and knowledge.

Mrunmayi Burande
Mrunmayi Burande Pune

I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.

Pranav Patil
Pranav Patil Indore

Chiku Piku has amazing content. My child loves every moment of it. There are very few quality magazines for kids and amazing content. Highly recommended!

Sneha M
Sneha M Mumbai

1-3 वयोगटातली मुलं चिकूपिकू कसं वापरतात? बघा 

FAQ's

अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात
आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.
हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.
ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.