Marathi Varnamala Flash cards | मराठी अक्षरपत्ते |
★★★★★1242 Rating | 40 Reviews
मुलांना मराठी अक्षरांची हसत खेळत ओळख करून देणारे हे अक्षरपत्ते!
₹299/-
Shipping Included
Description:
मराठी भाषा सोपी होऊन डोळ्यासमोर यावी यासाठी हे पत्ते तयार केले आहेत. यामध्ये काय काय आहे?
स्वर, व्यंजन यांचे प्रत्येकी २ पत्ते
प्रत्येक अक्षर लिहिण्याची पद्धत/स्ट्रोक
अक्षराच्या मागे त्याचे शब्द
काना, मात्रा, वेलांटीसारखी सगळी स्वरचिन्हे
बाराखडी तक्ता
हे पत्ते वापरून खेळता येतील असे १० खेळ
Every card, front and back!
प्रत्येक पत्त्यावर एक एक अक्षर आणि पत्त्याच्या मागच्या बाजूला त्या अक्षराचे शब्द आणि अक्षर कसं लिहायचं याचे स्ट्रोक्स आहेत.
Loved by families, trusted by everyone!
It is a treat to see my 2 year old son with his stack of Chiku Piku books. He can't read but still goes through at least 3-4 issues every day. Recalls the stories we have told him from the Chiku Piku books and sometimes tells those to us too. It has enriched him with amazing vocabulary and knowledge.
Mrunmayi BurandePune
I recently received the August edition of Chikupiku for my three-year-old daughter, and it has been a delightful experience for both of us. The magazine is filled with vibrant pictures and a captivating theme that instantly caught her attention.
Pranav PatilIndore

Chiku Piku has amazing content. My child loves every moment of it. There are very few quality magazines for kids and amazing content. Highly recommended!
जेवढं तुम्ही ह्या मुलांना द्याल तेवढं त्यांचा मेंदू शोषून घेईल - नवीन विषय, गोष्टी, गाणी, शब्द, activities, ही मुलं हे सगळं अनुभवायला तयार आहेत!
₹2,050
Your Cart
Your cart is empty.
FAQ's
अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात

हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं.
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.
ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.