Promotional banner
Promotional banner
carnival ticket bookingcarnival details

चिकूपिकू कार्निव्हल म्हणजे पूर्ण दिवसाची धमाल!


चिकूपिकू कार्निव्हल म्हणजे फक्त खेळ-खाऊ नाही, तर आपल्या लहानपणाच्या आठवणी मुलांसोबत पुन्हा जगण्याची एक खास संधी! जुन्या खेळांची, संस्कृतीची, परंपरांची आणि आपल्या बालपणाच्या साध्या पण सुंदर जगाची मुलांना करून देणारी हटके सफर. अनुभव, कला, संगीत, मौज-मस्ती आणि मनात कायम घर करून राहील असा एक उनाड दिवस. काय मग, येताय ना?

Old is gold थीमवर आधारित नाटुकली, वर्कशॉप्स, टूर, म्युझिकल आणि बरंच काही. आपल्या बालपणीच्या साध्या, सुंदर जगाची मुलांना ओळख करून देणारी हटके सफर. काय मग, येताय ना?

natukali
radio illustrator

कल्पेशदादा आणि प्रतीक्षाताई आपल्याला नाटुकलीमधून एका खोडकर बुजगावण्याची गोष्ट आणि एक लोककथा दाखवतील.

natukali
natukali
natukali
radio illustrator

कल्पेशदादा आणि प्रतीक्षाताई आपल्याला नाटुकलीमधून एका खोडकर बुजगावण्याची गोष्ट आणि एक लोककथा दाखवतील.

lokkalechi safar
scope

ओव्या, वासुदेव, नंदीबैल यांची गाणी ऐकत आणि ढोल-ताशाच्या तालावर ठेका देत एक गाण्यातून उलगडणारी गोष्ट सादर होईल.

junya parmpara, lokkala
lokkalechi safar
Gramophone

ओव्या, वासुदेव, नंदीबैल यांची गाणी ऐकत आणि ढोल-ताशाच्या तालावर ठेका देत एक गाण्यातून उलगडणारी गोष्ट सादर होईल.

junya parmpara, lokkala
अक्कणमाती चिक्कणमाती
ank mati

अक्कणमाती चिक्कणमाती ... अश्शी माती सुरेख बाई.दीप्तीताई शाडूच्या मातीची चूल आणि भांडी करायला शिकवणार आहे. ती भांडी घेऊन भातुकली खेळायला किती मजा येईल ना?

mud art
mud art
अक्कणमाती चिक्कणमाती
ank mati

अक्कणमाती चिक्कणमाती ... अश्शी माती सुरेख बाई. दीप्तीताई शाडूच्या मातीची चूल आणि भांडी करायला शिकवणार आहे. ती भांडी घेऊन भातुकली खेळायला किती मजा येईल ना?

art workshop
image

आईबाबांनाही लहानपणी खूप आवडायचा आणि आजही मुलांना तितकाच जादुई वाटणारा कॅलिडोस्कोप आपण स्वतः तयार करायला शिकणार आहोत.

art and craft - candoscope
art workshop
candoscope

आईबाबांनाही लहानपणी खूप आवडायचा आणि आजही मुलांना तितकाच जादुई वाटणारा कॅलिडोस्कोप आपण स्वतः तयार करायला शिकणार आहोत.

art and craft - candoscope
zapurda art museum tour
jat

जुन्या स्वयंपाकघरात आपली आजी- पणजी काय वापरत असतील? जुन्या काळच्या सायकली कशा असायच्या? दागिने, कपडे आणि अशा अनेक छान जुन्या वस्तू जवळून पाहत खास आर्ट गॅलरीची टूर करणार आहोत.

photo gallery
lamp kandil
photo gallery
jat
cycle
zapurda art museum tour

जुन्या स्वयंपाकघरात आपली आजी- पणजी काय वापरत असतील? जुन्या काळच्या सायकली कशा असायच्या? दागिने, कपडे आणि अशा अनेक छान जुन्या वस्तू जवळून पाहत खास आर्ट गॅलरीची टूर करणार आहोत.

याशिवाय हॅन्ड टॅटू, अंगणातले खेळ, खाऊ आणि खरेदीही असेलच!

carnival ticket booking
carnival details

Activity Schedule

Desktop Schedule
Mobile Schedule



Instructions

  • रजिस्ट्रेशन 10.30 वाजता सुरू होईल. बरोब्बर ११ पासून भरगच्च कार्यक्रम आहे त्यामुळे उशीर करू नका. 
  • तिकिटात नाटुकली आणि म्युझिकल असे दोन शो, दोन वर्कशॉप्स, झपूर्झा म्युझिअमची टूर, काही खेळ आणि इतर गमतीजमती समाविष्ट आहेत.
  • तिकिटात जेवण समाविष्ट नाही. आम्ही कार्निवलसाठी काही जेवणाचे ऑप्शन उपलब्ध करून देत आहोत. जेवणाच्या व्यवस्थेच्या अंदाजासाठी तिकीट विकत घेतानाच जेवणाची ऑर्डर बुक करा.
  • पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ ठेवावी.
  •  जाण्यायेण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःच करायची आहे. (Ample parking space available.) ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांच्यासाठी कर्वेनगर ते झपूर्झा ट्रान्सपोर्ट at cost उपलब्ध करून देत आहोत. तिकिटाच्या वेळी त्याचे बुकिंग करू शकता.
  •  झपूर्झाच्या मागे खडकवासला बॅकवॉटरचे सुंदर दृश्य आहे पण तिथून कोणालाही पाण्यात उतरण्याची परवानगी नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलांनासुद्धा पाण्यात उतरू देऊ नका. 
  • ऊन आणि पावसाचा काही भरवसा नाही त्यामुळे छत्री आणि टोप्या जवळ ठेवाव्या. 

Note: ह्या कार्यक्रमातून उत्पन्न होणाऱ्या निधीचा उपयोग चिकूपिकू Foundation च्या सामाजिक कार्यासाठी केला जाईल. For more information, visit: www.chikupikufoundation.com





Carnival Ticket
Carnival Ticket Mobile
carnival photo gallery
chikupiku carnival gallery
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.