बखर बिम्मची हे प्रख्यात मराठी लेखक ही जी. ए. कुलकर्णी यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं खास पुस्तक! बिम्म असं निराळंच नाव असलेल्या मुलाच्या छोट्याशा जगात रोज काहीतरी नवीन घडत असतं. त्याचे प्रश्न, त्याच्या कल्पना आणि आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याची त्याची निरागस नजर मुलांनाही विचार करायला आणि कल्पनांच्या दुनियेत रमायला भाग पाडते.
सोप्या, ओघवत्या भाषेत सांगितलेली ही कथा मुलांची निरीक्षणशक्ती, कुतूहल आणि वाचनाची आवड वाढवते. जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेलं हे पुस्तक मराठी बालसाहित्यातील एक खास ठेवा आहे आणि चिकूपिकूच्या टीमचंसुद्धा आवडतं पुस्तक आहे.
Number of pages : 72