मुग्धाची रंगीत गोष्ट ही जी. ए. कुलकर्णी यांनी लिहिलेली कल्पनाशक्ती, निसर्ग आणि बालविश्व यांची सुंदर सांगड घालणारी कथा आहे.
मुग्धाच्या नजरेतून उलगडणारं हे रंगीबेरंगी जग मुलांना झाडं, फुलं, पक्षी, प्राणी आणि निसर्गाशी एक मैत्रीचं छान नातं जोडायला शिकवतं. छोट्या-छोट्या गोष्टींमधला आनंद शोधत ही कथा मुलांना कल्पनांच्या सुंदर दुनियेत घेऊन जाते. खेळकर, निरागस आणि हसरी मुग्धा मुलांना त्यांची मैत्रीणच वाटेल.
सहजसुंदर भाषा, वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांबरोबर घडणारे गमतीशीर प्रसंग यामुळे ही गोष्ट लहान वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. मराठी भाषेची गोडी, निसर्गप्रेम आणि कल्पनाशक्ती जपणारं हे पुस्तक मुलांसोबत वाचण्याचा एक सुंदर अनुभव ठरतो. चिकूपिकूच्या टीमचंसुद्धा हे आवडतं पुस्तक आहे.
Number of pages : 45