भेटा उचापती गोलूला! एक चिमुकली, गोड, खोडकर आणि प्रचंड जिज्ञासू मुंगी!
नवीन काही दिसलं की गोलूचे उद्योग सुरू! कधी फजिती, कधी धमाल, तर कधी नवी अडचण. पण प्रत्येक उचापतीतून गोलू काहीतरी नवीन शिकते.
पुस्तकाची खास वैशिष्ट्यं:
गोड आणि खोडकर मुंगीच्या मजेशीर गोष्टी
मुलांच्या कुतूहलाला चालना देणारं पुस्तक
प्रत्येक उचापतीतून काहीतरी नवीन शिकण्याची संधी
आकर्षक, रंगीत चित्रं
वय : २ ते ६ वयोगटातील मुलांसाठी उत्तम
अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.
मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात
आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.
हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.
ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.