कपडे ही फक्त गरज नाही. त्यातून आपली आवड, निवड, संस्कृती आणि वेगळेपणही दिसत असतं. म्हणूनच मुलांना स्वतःचे कपडे निवडण्याचं स्वातंत्र्य देतानाच, दुसऱ्याची निवड आपल्यापेक्षा वेगळी असू शकते आणि तिचाही आदर करायचा, ही जाणीव लहानपणापासून रुजवणं महत्त्वाचं आहे.
याच कल्पनेभोवती फिरणारा हा अंक!
या अंकात खास काय?
"वेश अनेक, भारत एक"मधून भारतातल्या वेगवेगळ्या वेशभूषांची ओळख
शिवाजी महाराजांच्या जबरदस्त पोशाखाची रंजक गोष्ट
गांधीजी राजाला भेटायला गेले आणि पुढे काय झालं? - धमाल कविता
"नट्टा पट्टा" सारखी धमाल कविता
"चिमणी चित्र" आपल्या आवडीचा ड्रेस सजवण्याची activity
याशिवाय भरपूर गाणी, गोष्टी, चित्रं आणि मजेदार activities या अंकात आहेतच!
कपड्यांची गंमत अनुभवताना ‘प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असू शकते आणि तिचा आदर करायला हवा’ हा विचार मुलांपर्यंत सहज पोहोचवणारा हा रंगीबेरंगी अंक!
Availability : In StockIn StockOut of stockCategories:
Products