पूर्वीपासून चालत आलेली, साध्या-सुध्या लोकांमधली पण मनापासून उमटलेली, सोप्या शब्दात मोठं काही सांगणारी लोककला ... दिवाळी अंकातून मुलांपर्यंत घेऊन येतोय! पोवाड्याच्या बाजातून, वासुदेवाच्या हाकेतून, वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून!
"हा घास चिऊचा, हा घास काऊचा" असं म्हणत मुलांची आणि "खाऊ" ची ओळख होते. छोट्या मुलांच्या जगात खाऊ ही आनंदाची गोष्ट असते. म्हणूनच या अंकात आहे....- मुलांच्या आवडीचे खाऊ आणि...
सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन अशा अनेक सुपर हिरोचं आकर्षण मुलांना असतंच आणि आपल्याकडे तशा सुपर पॉवर्स असाव्यात असंही वाटत असतं आणि ते तशा कल्पनाही रंगवत असतात. कधी मनात सुपरहिरोसारखी धडाकेबाज एन्ट्री...
नदी गं नदीया महिन्याच्या चिकूपिकूच्या अंकात खळखळ वाहत आपल्याला भेटायला आल्यात 'नद्या'. नदी म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. ती आहे म्हणून आपण आहोत. अशा या जीवनदायिनी नदीविषयी मुलांच्या आणि आपल्या मनात...
घर म्हणजे काय? तुमची, आमची, आपल्या चिमुकल्यांची हक्काची जागा !! जिथे मुलांच्या बालपणीच्या आठवणी तयार होतात. जशी माणसांची घरं असतात तशीच प्राणी, पक्षी अगदी निर्जीव वस्तूंची सुद्दा घरं असतात नाही...
सुट्टी विशेषांक - "आत काय आहे?" आई तुझ्या पर्समध्ये काय आहे? एवढी मोठी झाडं बियांच्या आत कशी मावतात? फ्रिजच्या आतमध्ये, थंडीत बसून सगळ्या भाज्या कंटाळतात का गं? भंडावून सोडतात मुलं...
या महिन्यात चिकूपिकूचा सहावा वाढदिवस! वाढत्या वर्षांबरोबर चिकूपिकूचं कुटुंबसुद्धा वाढतंय. मुलांना दर्जेदार आणि चांगलं साहित्य वाचायला, ऐकायला मिळावं, त्यांची उत्सुकता, कल्पनाशक्ती वाढावी, जाणिवा समृद्ध व्हाव्या आणि पालकांनाही या प्रवासात एका...
या अंकातून आजीआजोबा हा गोड विषय घेऊन येत आहोत. गोष्टी आणि गाण्यांमधून या दोन स्पेशल माणसांच्या आठवणी, ऊब, प्रेम आणि मजा मुलांना समजू शकेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे....
या अंकात आहेत लाडवासारख्या खमंग गोष्टी, करंजी सारख्या गोड कविता, चकली सारखी कुरकुरीत कोडी, चिवड्यासारखे खुसखुशीत खेळ, अनारश्यांसारखे हसरे किस्से आणि आणि कडबोळी सारख्या मजेशीर Activities! चला, गोष्टींचा फराळ करू...
वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा...
अनेक मुलांचं बालपण आणि पालकांचं पालकत्व ज्यांनी आनंदाचं केलं अशा शोभा भागवत यांना हा मार्चचा अंक समर्पित करत आहोत. शोभाताई म्हणजे मुलांसाठी अतोनात प्रेम. गोष्टी, गाणी, गप्पांमधून त्या कोणत्याही मुलाला...
उत्कृष्ट बालसाहित्य दिवाळी अंकाचा पुरस्कार मिळालेल्या या विशेषांकाचा विषय प्रवास हा आहे. या अंकातली चिकूपिकू एक्सप्रेसची सफर नव्या, जुन्या, अनोळखी ठिकाणी आपल्याला घेऊन जाणार आहे. सिंदाबादची आठवी सफर, कापडाचा प्रवास,...
आपण मोठी माणसं खूप कमी वेळा आश्चर्यचकित होतो. कारण प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक आपल्या डोक्यात पक्कं असतं. मुलांचं तसं नसतं, त्यांना अनेक गोष्टी आश्चर्यकारक वाटतात. ‘तुला एक गंमत दाखवू?’ असं म्हटलं...
एप्रिल मे २०२२ चा हा ‘चिकूपिकू सुट्टी विशेषांक’ आहे.या वेळच्या सुट्टी विशेषांकाचा विषय आहे – साहस. लहान मुलं कोणाहीपेक्षा जास्त साहस रोज करतात. आईबाबांना सोडून राहणं, पायऱ्या चढणं- उतरणं, अनोळखी लोकांना भेटणं, पाहुण्यांसमोर...
चिकू-पिकूचा हा तिसरा वाढदिवस स्पेशल अंक. चिकू-पिकू अजून एका वर्षाने मोठे झाले. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या बच्चे कंपनीनेच त्यांना मोठं केलं. या अंकापासून काही नवे बदल केले आहेत. एक...
उड्या मारू, नाचू, गाऊ, खेळू, लोळू, मज्जा करू चिकूपिकूचा हा खेळ विशेषांक आहे. सगळ्याच लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा असते की ती सतत खेळतात. हालचाल करतात, उड्या...