स्क्रीन टाईमचं टाईम टेबल !
- पूजा दामले

 

माेठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांच्या हातात माेबाईल असणं, ही खूपच काॅमन गाेष्ट आहे. बदलत्या काळात अन्न, वस्त्र, निवारा, माेबाईल आणि इंटरनेट या जीवनावश्यक गाेष्टी असल्याचे जाेक्स, मीम्स अनेकदा बघायला मिळतात. एखाद्या वेळेस इंटरनेट बंद पडलं किंवा व्हाॅट्स अॅप, फेसबुक, इन्स्टासारख्या साेशल नेटवर्किंग साइट्स क्रॅश झाल्या की, कसं वाटतं?

एकूणच काय माेबाईल हा सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. तो पालकांच्या सवयीचा एक भाग असल्याने लहानपणापासूनच माेबाईल मुलांचा फ्रेण्ड हाेताे. पण, हा फ्रेण्ड त्यांना काेणत्या वयात भेटावा? त्याच्याशी किती आणि कशी मैत्री व्हावी? मुलाला त्या फ्रेण्डचा म्हणजेच माेबाईलचा किती आधार वाटावा ? या सगळ्याचं टाईम टेबल पालकांकडे असायला पाहिजे.

सध्याच्या काळात आपण AIच्या गप्पा मारत असताना, माेबाईल, इंटरनेट हे मुलांना माहित नसणं कसं शक्य आहे? असा विचार पालकांच्या मनात येताे. माेबाईल, इंटरनेट यांच्यापासून मुलांना लांब ठेवा, त्यांना या विषयाचे ज्ञान नकाे, असं आता काेणीच म्हणू शकणार नाही. काळाच्या गरजेप्रमाणे मुलांना शिक्षण देणं ही पालकांची जबाबदारी आहे. पण, त्याचबराेबर  मुलांची नैसर्गिक वाढ कशी हाेते, हे निसर्गाचं टाईमटेबल पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे.

लहान वयात मुलांना माेबाईल दिला तर? | Effects of mobile phones on children at a young age?  

0 ते 3 वयाेगटातील मुलं हे जगं पहिल्यांदा अनुभवत असतात. त्यांच्यासाठी सगळंच नवीन असतं. आपल्या पाच सेन्सेसचा वापर करून, मुलं हे नवीन जगं जाणून घेत असतात. त्यांच्या जवळच्या व्यक्ती कशा वागतात, बाेलतात, यातून मुलं शिकत असतात. म्हणजेच काय, तर एखाद्या स्पंजप्रमाणे आजूबाजूला घडणाऱ्या घटना, गाेष्टी सगळंच ती शाेषून घेऊन शिकत असतात. यामुळे या वयात मुलांची शारीरिक हालचाल हाेणं, नवीन गाेष्टी पाहणं, ऐकणं, त्या परत करून पाहणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण, याच वयात माेबाईल किंवा स्क्रीन मुलांचा फ्रेण्ड झाला… तर ?
स्क्रीन पाहताना माेबाईल असाे किंवा टीव्ही, लॅपटाॅप मुलं एकाच ठिकाणी बसून राहतात. त्यांची नजर फक्त स्क्रीनवर असते. यातून मुलांची वाढ कशी आणि कधी हाेणार ?

 

स्क्रीनचं टाईम टेबल कसं ठरवाल? | How to manage Screen Time Table?

 

  • पालकांनी मुलांसाठी एक ठराविक वेळ स्क्रीन टाईमसाठी ठरवून द्या. दिवसभरात किती वेळ ?, आठवड्यात किती दिवस ?
  • स्क्रीन टाईमलाही किमान एक तरी दिवस सुट्टी नक्कीच जाहीर करा.
  • मुलं सहा ते सात वर्षांची हाेईपर्यंत पालकांनी आणि मुलांनी एकत्र स्क्रीन टाईम एन्जाॅय केला, तर हे उत्तमच.
  • मुलं काय पाहात आहेत ? यावर लक्ष ठेवण्यासाठी एकत्र स्क्रीन पहा.  पण, पालकांना ते शक्य नसल्यास, मूलं काय बघतात. याकडे लक्ष दिले पाहिजे.  
  • स्क्रीन पाहताना चांगल्या गाेष्टी कुठल्या, कोणत्या गाेष्टी तुझ्या वयासाठी चांगल्या नाहीत, हे देखील मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

 


स्क्रीन टाईमचं टाईम टेबल | Screen Time Recommendations by Age - Screen Time Table

वय वेळ / उपाय
0 ते 3 मुलांना स्क्रीन टाईम नकाे… त्यांना जगाचा अनुभव द्या (Real Life Experiences) No Screen-Time!
3 ते 5 मुलांना थाेडा वेळ टीव्ही पाहायला देऊ शकता. दिवसभरात जास्तीत जास्त 15 मिनीटं. पण, अगदीच गरज असेल तर, नाही तर तुमचा मित्र चिकूपिकू आहे ना!
5 ते 7 माेबाईल देऊ शकता. पण, आधी मुलांची मागणी आहे का? याचा विचार करा. अर्धा ते पाऊण तास गरजेनुसार, दिवसभरात किती तुम्ही ठरवा. टीव्ही आणि माेबाईल दाेन्ही हवे असल्यास अर्धा अर्धा वेळ विभागून द्या.
7 ते 10 जास्तीत जास्त 1 तास गरजेनुसार,. पालकांनी मुलांशी इंटरनेट, त्याचा वापर, ताेटे याविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. मुलं माेबाईलचा वापर कसा करतात, याकडे लक्ष द्या.

 

मुलांना स्क्रीन टाईम देणं टाळले पाहिजे. मग, आता काय करायचं? | How to distract child from mobile?

  • 0 ते 2 वयाेगटातील मुलं असतील तर… । Managing screen time: Children 0-2 years

- एक लिस्ट करा. त्यामध्ये काेणत्या गाेष्टी, activities  पालक मुलांसाठी करू शकतात याची यादी असेल.   
- मुलांना चित्र दाखवून गाेष्ट सांगा. 
- बाहेर चक्कर मारून झाडे, पक्षी दाखवा. 
- गाेष्टी ऐकवा. 
- त्यांच्याशी गप्पा मारा.
- घरातील वस्तूंची नावे शिकवा.
- त्यांना स्ताेत्र किंवा गाणी म्हणून दाखवा. 
- मुलांना खेळ काढून त्यांना हवं तसं खेळू द्या. 
- मुलांना ‘चिकूपिकू’ची चिमणी चित्र ही अॅक्टिव्हीटी देऊ शकता. - चिमणी चित्र अॅक्टिव्हीटी मिळवा CLICK HERE

 

  • 2 ते 3 वयाेगटातील मुलं असतील तर… | Managing screen time: Children 2-3 years

- शाळेत जाण्याआधी बेसिक गाेष्टी म्हणजे वार, महिने, भाज्या, फळं, प्राणी, पक्षी, आकार यांची नावं सांगा.
-  क्ले, कणकेचा गाेळा खेळायला द्या.
- काेथिंबीर, पालेभाज्या निवडायला द्या. 
- कागद फाडायला द्या, कागदाचे गाेळे करायला द्या.
- बागेत, माेकळ्या जागेत खेळायला न्या.
- पुस्तक वाचून दाखवा. 
- शारीरिक हाचलाच हाेईल अशा अॅक्टिव्हीटज करून घ्या.
- पझल्स खेळायला द्या.  बाेर्ड गेम खेळायला द्या. 
- धान्य एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतायला सांगा. 
- कागदावर नुसत्या रेघाेट्या मारू द्या.  

‘चिकूपिकू’चे अंक तुम्हाला नक्कीच मुलांना स्क्रीनशिवाय गुंतवून ठेवण्यासाठी मदत करतील. Explore here - Click Here

  • ३ वर्षांवरील मुलं असतील तर...  | Managing screen time: Children 3+ years

- तीन वर्षांनंतर मुलांना थाेडा वेळ स्क्रीन टाईम सुरू करू शकताे. 
- छाेट्या स्क्रीनपेक्षा म्हणजे माेबाईल, आयपॅड, लॅपटाॅप ऐवजी टीव्ही दाखवा. 
- या वेळेतही मुलांना एकटं बसून टीव्ही पाहायला देण्यापेक्षा पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून टीव्ही पहा (पण मोठ्यांच्या सीरिअल त्यांच्याबरोबर बघणं टाळा).
- मुलांबराेबर टीव्ही पाहताना मुलांशी चर्चा करा. यातून मुलांचे लक्ष सतत स्क्रीनकडे राहणार नाही आणि दुसरं म्हणजे मुलं नवीन गाेष्टी शिकतील. 
- अनेकदा 4 ते 5 वर्षांच्या मुलांना सवय नसली, तरी इतरांचं पाहून किंवा आधीपासून सवय असल्यास हट्टाने स्क्रीन टाईम मागून घेतात.

स्क्रीन टाईम विषयी बाेलताना हे टाळू या | What to avoid while discussing about Screen-time?

  • मुलांवर आरडा - ओरडा करू नका. 
  • मुलांना अधिकाराने, धमक्या देऊन स्क्रीन टाईमचे नियम समजवू नका. 
  • स्क्रीन टाईमच्या चर्चेमुळे घरातील वातावरण बिघडू देऊ नका. 

स्क्रीन टाईम विषयी बाेलताना पालकांनी शांतपणे पण तितक्याच निश्चयाने मुलांशी बाेलणं आवश्यक आहे. आताच्या काळात मुलांना माेबाईल आणि इंटरनेटपासून लांब ठेवणं, शक्य नाही. पण, म्हणून त्याचा चुकीच्या पद्धतीने, जास्त वापर करणे हे याेग्य नाही.  हे टाळता येऊ शकते.  पालक मुलांना अन्य गाेष्टींची सवय, शिस्त लावण्यासाठी सतर्क असतात. त्याचप्रमाणे माेबाईल, टीव्ही, आयपॅड, इंटरनेट, अन्य गॅझेट्स वापर करण्याची शिस्त लावणं गरजेचं आहे. त्यासाठी पालकांनी थाेडा हटके विचार केला तर ही शिस्त, सवय मुलांना नक्कीच सहजरित्या लागू शकते.

Read More blogs on Parenting Here