प्रत्येकाच्या मेंदूत आठ वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. काही बुद्धिमत्ता ठळक तर काही फिकट असतात. मुलांच्या आवडी-निवडी आणि निरीक्षणांतून या बुद्धिमत्तांची झलक नक्की दिसते. 0 ते ६ वयोगटात मुलांचा मेंदू एखाद्या स्पंजसारखं काम करतो आणि मेंदूच्या शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. या दरम्यान जे काही अनुभव मुलांना मिळतील त्यावर मुलाची शारीरिक, मानसिक वाढ अवलंबून असते.
मुलांना निरनिराळे अनुभव देणाऱ्या गोष्टी, गाणी, चित्रं, कोडी आणि ऍक्टिव्हिटीज चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात आहेत. ह्या अनुभवांमुळे त्यांच्या विचारांचा, शिकण्याचा, कल्पनाशक्तीचा वेग वाढतो. त्यांना भरपूर प्रश्न सुचतात, नवीन शब्द कानावर पडतात, विचार मांडणं सोपं होतं, मुलांना कुठल्या विषयांमध्ये रुची आहे, कशा पद्धतीने शिकायला आवडतं हे पालकांना समजू लागतं.
केवळ शाळेतले विषय आणि अभ्यास त्यांना आयुष्यभर पुरणार नाहीत. लहानपणीच वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती मिळाली आणि त्यातला मुलांचा कल समजला तर पुढची दिशा निवडायलाही थोडे सोपे होऊ शकेल.
या प्रत्येक बुद्धिमत्ता समजून घेऊ या!
भाषिक-वाचिक बुद्धिमत्ता
(Linguistic/ Verbal Intelligence)
भाषेचा, शब्दांचा योग्य वापर करण्यासाठी ही बुद्धिमत्ता गरजेची असते. कोणत्याही प्रकारच्या संवादासाठी, अभ्यासासाठी आपल्याला आयुष्यभर ही बुद्धिमत्ता वापरावी लागतेच. चिकूपिकूमधल्या गोष्टी ऐकून भाषाविकास होतो. मुलं नवे शब्द वापरायला शिकतात. त्यांना काय वाटतं ते सांगायला शिकतात.
लेखक, पत्रकार, स्क्रिप्ट रायटर, कवी,निवेदक, वक्ते यांमध्ये भाषिक बद्धिमत्ता ठळक असते.
गणित आणि तार्किक बुद्धिमत्ता
(Mathematical / logical intelligence)
लॉजिकल विचार करण्यासाठी आणि हिशोब, गणिते, वैज्ञानिक संकल्पना यांसाठी ही बुद्धिमत्ता लागते. गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमधील साधी सोपी कोडी, खेळ, अक्टिव्हिटीजमुळे या बुद्धिमत्तेला चालना मिळते.
गणितज्ञ, अभियंते, आर्किटेक्चर यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते.
संगीत विषयक बुद्धिमत्ता
(Musical Intelligence)
संगीतामध्ये गती असणाऱन्यांमध्ये म्हणजेच गायक, वादक, संगीतकार यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमध्ये सोप्या तालातली गाणी असतात. ठेक्यातली गाणी एकत्र म्हणताना मजा येते आणि संगीतविषयक बुद्धिमत्तेचे अनुभवही मुलांना मिळतात.
गायक, वादक, संगीतकार आणि नर्तक यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते.
शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता
(Kinesthetic/Bodily Intelligence)
आपल्या अवयवांचा, शरीराचा नियंत्रित आणि सफाईदार वापर करण्यासाठी ही बुद्धिमत्ता लागते. खेळाडू, वादक, नर्तक, सर्जन यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. अंकात खेळ, हातांनी बनवायची सोपी खेळणी, कातरकाम, मातीकाम अशा अक्टिव्हिटीज असतात. यातून हस्तकौशल्य, हॅन्ड- आय कोऑर्डिनेशन मुलं शिकतात.
खेळाडूंमध्ये ही बुद्धिमत्ता असतेच तसंच नर्तक आणि वादकांमध्येसुद्धा ही बुद्धिमत्ता असते.
आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता
(Inter-personal Intelligence)
चांगला संवाद साधण्याची, नेतृत्व करण्याची क्षमता या बुद्धिमत्तेमुळे विकसित होते. चिकूपिकूतल्या गोष्टी ऐकून रोल प्लेसारख्या अक्टिव्हिटीज मुलं खेळतात, गोष्टी इतरांना सांगतात तेव्हा संवाद कौशल्याचा विकास होतो. शिवाजी महाराजांच्या गोष्टींमधून नेतृत्वाची प्रेरणा मुलांना मिळते.
ही बुद्धिमत्ता एखाद्या शास्त्रज्ञात, कलाकारात, पुढारी, समुपदेशक, नेते, खेळाडूतही असते.
व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता
(Intra-personal Intelligence)
स्वतःशी विचार करून त्यातून नवे निष्कर्ष काढणे, वेगवेगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध समजून घेणे या बुद्धिमत्तेमुळे शक्य होते. अंकामध्ये शास्त्रज्ञांच्या लहानपणीच्या गोष्टी, त्यांनी लावलेल्या शोधांच्या गोष्टी दिलेल्या असतात. त्या वाचून प्रेरणा मिळते, नवे प्रश्न पडतात. मुलं विचार करायला लागतात.
लेखक, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, गायक, तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे विचारवंत ही बुद्धिमत्ता असते.
दृश्य- अवकाशीय बुद्धिमत्ता
(Spatial/Visual Intelligence)
सौंदर्यदृष्टी आणि कोणत्याही जागेचा प्रभावी वापर ही या बुद्धिमत्तेची ठळक वैशिष्टयं. चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर्स, आर्किंटेक्ट्स, फॅशन डिझायनर्स यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमधल्या अक्टिव्हिटीजमधून या बुद्धिमत्तेचे अनुभव मुलांना मिळतात. मुलांना स्वतंत्र विचारांनी करता येतील अशा या हटके अक्टिव्हिटीज असतात.
चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफेर्स, इंटिरियर्स डिझायनर्स, ऍनिमेटर्स, आकिंटेक्टस्, फॅशन डिझायनर्स, शेफ यांच्यात हीच बुद्धिमत्ता असते.
निसर्गविषयक बुद्धिमत्ता
(Intelligence Naturalistic)
आजूबाजूच्या निसर्गाविषयी जाणीव आणि नातं तयार होण्यासाठी ही बुद्धिमत्ता उपयोगी पडते. आपण निसर्गावर अवलंबून आहोत आणि त्याविषयी जागरूकपणे वागण्यासाठी हे नातं महत्त्वाचं आहे. चिकूपिकूमधल्या प्राणी, पक्षी, किडे-कीटक, झाडं यांच्या गोष्टींमधून मुलं निसर्गाशी जोडली जातात. निसर्गातल्या घटकांविषयी संवेदनशील होतात.
भूगोल अभ्यासक, पर्यावरणतज्ञ, निसर्ग अभ्यासक, सर्पमित्र, पक्षीनिरीक्षक अशा व्यक्तींकडे निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते.
या प्रत्येक बुद्धिमत्ता समजून घेऊ या!
भाषिक-वाचिक बुद्धिमत्ता
(Linguistic/ Verbal Intelligence)
भाषेचा, शब्दांचा योग्य वापर करण्यासाठी ही बुद्धिमत्ता गरजेची असते. कोणत्याही प्रकारच्या संवादासाठी, अभ्यासासाठी आपल्याला आयुष्यभर ही बुद्धिमत्ता वापरावी लागतेच. चिकूपिकूमधल्या गोष्टी ऐकून भाषाविकास होतो. मुलं नवे शब्द वापरायला शिकतात. त्यांना काय वाटतं ते सांगायला शिकतात.
लेखक, पत्रकार, स्क्रिप्ट रायटर, कवी, निवेदक, वक्ते यांमध्ये भाषिक बद्धिमत्ता ठळक असते .
गणित आणि तार्किक बुद्धिमत्ता
(Mathematical / logical intelligence)
लॉजिकल विचार करण्यासाठी आणि हिशोब, गणिते, वैज्ञानिक संकल्पना यांसाठी ही बुद्धिमत्ता लागते. गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभियंते यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमधील साधी सोपी कोडी, खेळ, अक्टिव्हिटीजमुळे या बुद्धिमत्तेला चालना मिळते.
गणितज्ञ, अभियंते, आर्किटेक्चर यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते.
संगीत विषयक बुद्धिमत्ता
(Musical Intelligence)
संगीतामध्ये गती असणाऱन्यांमध्ये म्हणजेच गायक, वादक, संगीतकार यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमध्ये सोप्या तालातली गाणी असतात. ठेक्यातली गाणी एकत्र म्हणताना मजा येते आणि संगीतविषयक बुद्धिमत्तेचे अनुभवही मुलांना मिळतात.
गायक, वादक, संगीतकार आणि नर्तक यांमध्ये ही
बुद्धिमत्ता असते.
शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता
(Kinesthetic/Bodily Intelligence)
आपल्या अवयवांचा, शरीराचा नियंत्रित आणि सफाईदार वापर करण्यासाठी ही बुद्धिमत्ता लागते. खेळाडू, वादक, नर्तक, सर्जन यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता असते. अंकात खेळ, हातांनी बनवायची सोपी खेळणी, कातरकाम, मातीकाम अशा अक्टिव्हिटीज असतात. यातून हस्तकौशल्य, हॅन्ड- आय कोऑर्डिनेशन मुलं शिकतात.
खेळाडूंमध्ये ही बुद्धिमत्ता असतेच तसंच नर्तक आणि
वादकांमध्येसुद्धा ही बुद्धिमत्ता असते.
आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता
(Inter-personal Intelligence)
चांगला संवाद साधण्याची, नेतृत्व करण्याची क्षमता या बुद्धिमत्तेमुळे विकसित होते. चिकूपिकूतल्या गोष्टी ऐकून रोल प्लेसारख्या अक्टिव्हिटीज मुलं खेळतात, गोष्टी इतरांना सांगतात तेव्हा संवाद कौशल्याचा विकास होतो. शिवाजी महाराजांच्या गोष्टींमधून नेतृत्वाची प्रेरणा मुलांना मिळते.
ही बुद्धिमत्ता एखाद्या शास्त्रज्ञात, कलाकारात, पुढारी, समुपदेशक, नेते, खेळाडूतही असते.
व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता
(Intra-personal Intelligence)
स्वतःशी विचार करून त्यातून नवे निष्कर्ष काढणे, वेगवेगळ्या गोष्टींचा परस्परसंबंध समजून घेणे या बुद्धिमत्तेमुळे शक्य होते. अंकामध्ये शास्त्रज्ञांच्या लहानपणीच्या गोष्टी, त्यांनी लावलेल्या शोधांच्या गोष्टी दिलेल्या असतात. त्या वाचून प्रेरणा मिळते, नवे प्रश्न पडतात. मुलं विचार करायला लागतात.
लेखक, शास्त्रज्ञ, गणितज्ञ, गायक, तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे विचारवंत ही बुद्धिमत्ता असते.
दृश्य- अवकाशीय बुद्धिमत्ता
(Spatial/Visual Intelligence)
सौंदर्यदृष्टी आणि कोणत्याही जागेचा प्रभावी वापर ही या बुद्धिमत्तेची ठळक वैशिष्टयं. चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर्स, आर्किंटेक्ट्स, फॅशन डिझायनर्स यांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. चिकूपिकूमधल्या अक्टिव्हिटीजमधून या बुद्धिमत्तेचे अनुभव मुलांना मिळतात. मुलांना स्वतंत्र विचारांनी करता येतील अशा या हटके अक्टिव्हिटीज असतात.
चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफेर्स, इंटिरियर्स डिझायनर्स, ऍनिमेटर्स, आकिंटेक्टस्, फॅशन डिझायनर्स, शेफ यांच्यात हीच बुद्धिमत्ता असते.
निसर्गविषयक बुद्धिमत्ता
(Intelligence Naturalistic)
आजूबाजूच्या निसर्गाविषयी जाणीव आणि नातं तयार होण्यासाठी ही बुद्धिमत्ता उपयोगी पडते. आपण निसर्गावर अवलंबून आहोत आणि त्याविषयी जागरूकपणे वागण्यासाठी हे नातं महत्त्वाचं आहे. चिकूपिकूमधल्या प्राणी, पक्षी, किडे-कीटक, झाडं यांच्या गोष्टींमधून मुलं निसर्गाशी जोडली जातात. निसर्गातल्या घटकांविषयी संवेदनशील होतात.
भूगोल अभ्यासक, पर्यावरणतज्ञ, निसर्ग अभ्यासक, सर्पमित्र, पक्षीनिरीक्षक अशा व्यक्तींकडे निसर्गविषयक बुद्धिमत्ता असते.
चिकूपिकूच्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये काय काय आहे? वर्षभरात १० अंक - सुट्टी आणि दिवाळी विशेषांक या दोन मोठ्या जोड-अंकांसहित फ्री शिपिंग अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपातसुद्धा याशिवाय ३६५ ऑडिओ गोष्टी...