मी श्वेता कुलकर्णी, माझा मुलगा पावणे दोन वर्षाचा आहे मी, त्याला दीड वर्षाचा असल्यापासून चिकू पिकू चा मोबाईल app मधल्या गोष्टी ऐकवत आहे. त्याला त्यातल्या गोष्टी खूप आवडतात. पौराणिक कथा, प्रवास वर्णने, अशा वेगवेगळ्या प्रकारचा गाणी आणि गोष्टी आम्ही दोघेही enjoy करतो.
मी परदेशात असल्याने मला चिकू पिकूचे अंक नाही पाहता आले. पण तेही खूप सुंदर असतीलच..
ज्या रंजक पद्धतीने गोष्टी सांगितल्या जातात, वर्णने केली जातात, त्यामुळे मुलांचा भाषा विकास, कल्पना शक्ती वाढते.
काही किरकोळ suggestions.. App मध्ये काही अपडेट केले तर अजून वापरायला सोपे जाईल, जसे बागुलबुवा आणि छबी किंवा Fishira चा खूप गोष्टी आहेत, त्या search मध्ये type केल्यावर सर्व गोष्टी येतात, पण त्या sequence ने येत नाहीत त्यामुळे सुरवात कोणत्या गोष्टी पासून होते कळत नाही. गोष्टींचा खाली काही caption मध्ये जर त्याचा अंक किंवा माहिती दिली तर save किंवा like करायची जरी केली नसली तरी नंतर त्या माहितीमुळे नाव शोधू शकतो..
अजून खूप गोष्टी ऐकायचा आहेत.. खूप खूप शुभेच्छा..