My World Combo ( Pack Of 5)

Everyday Life & The World Around Us
मुलांच्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी ओळखीच्या गोष्टी - घर, खाऊ, नदी, कचरा आणि कपडे, यांच्याकडे नव्या नजरेनं बघायला शिकवणारा हा खास My World Combo.
1.  आमचं घर
माणसं, प्राणी, पक्षी आणि वस्तूंचीही स्वतःची जागा असते. वेगवेगळ्या घरांच्या गमतीदार गोष्टी सांगणारा आपुलकीचा अंक.

2. खा खा खाऊ
मुलांच्या आवडीचे पदार्थ, सणांचा खाऊ, प्राण्यांचं अन्न आणि वेगवेगळ्या देशांतील खाद्यकथा. खाण्याची मजा आणि चांगल्या सवयी दोन्ही सांगणारा अंक.

3. नदी गं नदी
नदी कुठून येते, तिच्यात कोण राहतं आणि तिचं जग कसं असतं? नदी आणि निसर्गाची ओळख करून देणारा सुंदर अंक.

4. कचरा
आपण टाकलेला कचरा पुढे कुठे जातो? त्याचं काय होतं? मुलांना विचार करायला आणि छोटे उपाय शोधायला लावणारा अंक.

5. पोशाख
वेगवेगळे कपडे, भारतातील वेशभूषा आणि आपापल्या आवडी-निवडी. प्रत्येकाची निवड वेगळी असू शकते, हा विचार सहज सांगणारा रंगीबेरंगी अंक.

My World Combo म्हणजे मुलांच्या रोजच्या जगातल्या छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि नव्यानं पाहण्याची मजा!

₹550.00

शिपिंग चेकआउट करताना गणना केली जाते.
स्टॉक संपला
उपलब्धता: स्टॉकमध्ये आहेस्टॉकमध्ये आहेस्टॉक संपलावर्ग: उत्पादने, चिकूपिकू | मुलांसाठी मराठी स्टोरीबुक्स कॉम्बो पॅक मिळवा

FAQ's

माझं मूल अजून वाचत नाही, लहान आहे. आत्तापासून कशाला पुस्तकं घ्यायची?

अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.

इंग्लिश मिडीयमच्या मुलांना हे कसं उपयोगी पडेल?

मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात

मलाच मराठीमधलं एवढं छान वाचता येत नाही. मुलांना कसं वाचून दाखवणार?

आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.

नक्की कोणत्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे चिकूपिकू?

हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.

काय काय येतं सबस्क्रिप्शन मध्ये?

सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.

कोणत्याही महिन्यात सुरू करता येतं का?

ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
पुरेसे आयटम उपलब्ध नाहीत. फक्त [max] शिल्लक आहेत.

My World Combo ( Pack Of 5)

₹550.00