रोज रोज रिक्षा हे १ ते ५ वर्षांच्या लहान मुलांसाठी खास तयार केलेले मजेशीर चित्रपुस्तक आहे.
रिक्षांचं प्रचंड आकर्षण असलेल्या एका छोट्या मुलासोबत आठवडाभराचा हा रम्य प्रवास करा. आठवड्यातील प्रत्येक दिवशी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षा भेटतात आणि त्यातून मुलांना दिवसांची ओळखही सहज होते.
सोप्या मराठी वाक्यरचना, मोठा व स्पष्ट फॉन्ट, पुन्हा पुन्हा येणारे शब्द आणि रंगीत चित्रांमुळे हे Level 1 वाचनासाठी अगदी योग्य पुस्तक आहे. मराठी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी, सुरुवातीची वाचनकौशल्ये विकसित करण्यासाठी आणि एकत्र बसून गोष्टी वाचण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहे.
Number of pages : 20