२०२१ मधले काही अंक सगळ्याच मुलांचे खूप आवडीचे आहेत. अगदी छोट्या मुलांनाही चित्र बघून गोष्टी कळतील, आवडतील असा हा पुस्तकांचा संच आहे. अंकांच्या थीमसाठी एक से एक भन्नाट विषय घेतले आहेत. सुट्टी विशेषांकामध्ये वेगवेगळे भरपूर खेळ आहेत, पाऊसपाणी आणि मैत्री विषयावरच्या अंकात मुलांना आपल्याशा वाटतील अशा गोष्टी आणि activities आहेत. झाड विषयाच्या अंकात आणि पक्षी विशेषांकात तर प्रत्येक पानावर झाडांविषयीच्या आणि पक्ष्यांविषयीच्या इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की पालकांना पण हे अंक नक्की आवडतील, नवीन माहिती देतील. Coming together ही कल्पना घेऊन केलेल्या अंकाच्या कव्हरवर गोधडीचं सुंदर चित्र आहे आणि बॅक-कव्हर मुद्दाम मुलांना रंगवायला ठेवलं आहे. 'खा खा खाऊ' नाव असलेला दिवाळीचा खास मोठा विशेषांक तर आवडीच्या खाऊच्या गोष्टींनी भरला आहे. हा सेट मुलांना सुट्टीतला खाऊ म्हणून नक्की भेट द्या.