Combo Subscription Offer मध्ये काय काय समाविष्ट आहे?
Combo Subscription Offer मध्ये Marathi Magazine Subscription आणि Marathi Audio Stories Subscription असे दोन्हीचे Subscription एकत्र सवलतीच्या दरात मिळते.
Marathi Magazine Subscription मध्ये काय काय समाविष्ट आहे?
वार्षिक सबस्क्रिप्शन मध्ये १० अंक आणि shipping चार्जेस समाविष्ट आहेत. ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक असतो आणि एप्रिल – मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक असतो आणि बाकीच्या महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण १० अंक मिळतात. ६ महिन्यांच्या सबस्क्रिप्शनमध्ये ५ अंक मिळतात ज्यात एक विषेशांक असतो.
त्याशिवाय पालकांना आवडतील असे ब्लॉग, मुलांसाठी काही व्हिडिओ स्वरूपातील ऍक्टिव्हिटीज या फेसबुक, व्हाट्सअँप, यु-ट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात.
Marathi Audio Stories Subscription मध्ये काय काय समाविष्ट आहे?
Marathi Audio Stories Subscription मध्ये आमच्या जम्मत गोष्टी या मोबाईल App वरच्या ७००+ ऑडिओ गोष्टी उपलब्ध होतात. ह्यात अंकातल्या गोष्टी ऑडिओ स्वरूपात असतातच पण याशिवाय छोट्यांचे रामायण, मोगलीच्या गोष्टी, बडबडगीते, कृष्णाच्या गोष्टी आणि अशाच भरपूर गोष्टी आहेत. तसेच ह्यात आम्ही नव-नवीन Playlist add करतच असतो.
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
भारतात जिथे इंडियन पोस्ट पोहोचू शकते अशा सर्व ठिकाणी आम्ही चिकूपिकू मासिक पाठवू शकतो. पुण्यातील ऑर्डर्स कुरिअरद्वारे आणि पुण्याबाहेरील ऑर्डर्स या रजिस्टर्ड इंडियन पोस्टाने पाठवल्या जातात.
Shipping charges किती? कोणत्या प्रसंगी शिपिंग चार्जेस वेगळे द्यावे लागतात?
वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.
* *जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹४० आकारले जातील.
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
चिकूपिकू मासिकाच्या उद्देशांपैकी महत्त्वाचे काही उद्देश म्हणजे मुलांचा स्क्रीन-टाईम कमी करणे, मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे, वाचनाची आवड वाढवणे, हातांनी ऍक्टिव्हिटीज करण्यास, वस्तू -खेळणी बनविण्यास प्रोत्साहन देणे हे आहेत. त्यामुळे हे हातात धरून वाचता येईल, त्यावर चित्र काढता, रंगवता येतील असं खरंखुरं physical मासिक आहे. मासिकातील गोष्टी, चित्रं कशी असतात याची कल्पना येण्यासाठी तुम्ही ह्या
लिंक वर जाऊन एक e-मासिक वाचून बघू शकता.
चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे? English मध्ये काही असते का?
मातृभाषा ही मुलाची पहिली भाषा असते. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं.
हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे.
तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट / कविता आणि ऍक्टिव्हिटीसुद्धा अंकात असतात.
1 ते 10 वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात.
१ ते ३ वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील.
४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील.
अक्षर ओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
सबस्क्रिप्शन घेतल्यावर मासिक किती दिवसात येते? आणि सबस्क्रिप्शन कधी संपेल?
मासिक साधारण पणे सबस्क्रिप्शन घेतल्या दिवसापासून १० ते १५ दिवसात येते. आणि ज्यांनी आधीच सबस्क्रिप्शन घेतले आहे त्यांची मासिके दर महिन्याच्या १५ ते २० तारखेपर्यंत येतात.
सुट्टी आणि दिवाळी विषेशांक हे दोन महिन्याचे मिळून जोड-अंक असतात. सुट्टी विशेषांक (एप्रिल-मे) चा एप्रिल १५-२० तारखेपर्यंत येतो. दिवाळी विशेषांक (ऑक्टोबर - नोव्हेम्बर) ऑक्टोबर १५-२० तारखेपर्यंत येतो.
पत्ता बदलला असेल तर नवीन पत्त्यावर मासिके येतील का?
नवीन पत्ता आमच्या डिलिव्हरीच्या टप्प्यात येत असेल (इंडियन पोस्ट जिथे जिथे जाऊ शकेल तिथे सगळीकडे) तर आम्ही नक्कीच नवीन पत्त्यावर मासिक पाठवू. आमच्या कस्टमर सपोर्ट टीमला Whatsapp / Phone करून तुम्ही नवीन पत्ता कळवू शकता. (९३०७८७४०२७)
एखादे मासिक पोचले नाही तर काय करायचे?
काही कारणाने मासिक मिळाले नाही / पोचले नाही तर आमच्या कस्टमर सपोर्ट टीमला फोन / Whatsapp वर Shipping Dispatch details विचारू शकता. काही तांत्रिक कारणाने मासिक पोचले नसेल तर आम्ही ते परत पाठवायचा नक्की प्रयत्न करू.
भारताबाहेर delivery होते का?
भारताबाहेर डिलिव्हरीचा option सध्या उपलब्ध नाही आहे. परंतु शिपिंग चार्जेस जर customer उचलणार असतील / मासिकं कोणी सोबत carry करणार असतील तर आम्ही अशी व्यवस्था करून देऊ.
मासिकं bulk मध्ये ऑर्डर करता येतात का?
नक्कीच! अशी request आम्हाला ई-मेल / Whatsapp द्वारे कळवावी. शिवाय चिकूपिकूचे आधी publish झालेले अंक सुद्धा stock नुसार bulk मध्ये ऑर्डर करू शकता.
विकत घेण्यापूर्वी आम्हाला मासिक प्रत्येक्ष बघायचे असेल तर कुठे मिळेल?
तुम्ही चिकूपिकू मासिकं विकत घेऊ शकता. शिवाय आमच्या पुण्याच्या कर्वेनगरमधल्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही कधीही मासिकं बघू शकता.
ह्याशिवाय तुमच्या शहरातसुद्धा चिकूपिकू मिळावं असं वाटत असेल तर आम्हाला नक्की तुमच्या शहरातल्या bookstores सोबत गाठ घालून द्यावी.