-10%

₹885.00 ₹799.00SAVE 10%

Shipping calculated at checkout.
Out of stock

चिकूपिकू 2026 कलेक्शन


January–August 2026 चे सर्व अंक एकाच कॉम्बोमध्ये

बाळांच्या गोड दुनियेपासून गुपितं, पंचेंद्रियं, कंटाळा, भू-भू आणि केसांपर्यंत — प्रत्येक अंकाचा विषय वेगळा आणि मुलांच्या कुतूहलाला नवी दिशा देणारा. गोष्टी, कविता, गाणी, सुंदर चित्रं, मजेदार माहिती आणि भरपूर activities असा वाचनाचा भरपूर खजिना या कॉम्बोमध्ये मिळेल.

या कॉम्बोमध्ये मिळतील 

इल्लु इल्लु पिल्लू | जानेवारी २०२६
माणसं, प्राणी-पक्षी आणि झाडांच्या पिल्लांच्या गोड दुनियेत घेऊन जाणारा अंक.

७ वा वाढदिवस स्पेशल | फेब्रुवारी २०२६

सात रंग, सात सूर, सात वार आणि ‘सात’भोवतीच्या मजेदार गोष्टी-गाण्यांनी भरलेला खास वाढदिवस अंक.

ओळखा गुपित ओळखा | मार्च २०२६

गुप्त संदेश, लपलेला खजिना, रहस्यं आणि कोणती गुपितं मोठ्यांना सांगायला हवीत हे सहजपणे सांगणारा अंक.

कानाडोजीत्व – सुट्टी विशेषांक | एप्रिल–मे २०२६

कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा या पंचेंद्रियांची मजा गोष्टी, गाणी, खेळ आणि activities मधून अनुभवायला देणारा भरगच्च सुट्टी विशेषांक.

मला कंटाळा आलाय! | जून २०२६

कंटाळ्यातूनच नव्या कल्पना, खेळ आणि स्वतःशी रमण्याची मजा शोधायला लावणारा अंक.

भू भू स्पेशल | जुलै २०२६

कुत्र्यांच्या मजेशीर गोष्टी, खरे किस्से आणि त्यांच्याशी सुरक्षितपणे कसं वागायचं हे सांगणारा खास अंक.

असे केस तसे केस | ऑगस्ट २०२६

सरळ-कुरळ्या, लांब-छोट्या केसांमागचं विज्ञान आणि केसांबद्दलच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं शोधणारा अंक.

हा कॉम्बो का घ्यावा?

आत्ताच चिकूपिकूची Subscription सुरू केली आणि २०२६ मधले आधीचे अंक मिस झालेत? मग हा कॉम्बो तुमच्यासाठीच! जानेवारीपासून ऑगस्टपर्यंतचे सगळे अंक एकाच वेळी मिळतील.

मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांवर भरपूर वाचन आणि activities मिळाव्यात म्हणून, सुट्टीत किंवा प्रवासात सोबत ठेवण्यासाठी आणि मुलांना भेट देण्यासाठीही हा कॉम्बो छान पर्याय आहे.

२०२६ मधला चिकूपिकूचा आतापर्यंतचा सगळा वाचनखजिना — एकाच कॉम्बोमध्ये!

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

2025 Combo Pack of 7

₹885.00 ₹799.00