आपल्यासारखाच प्राण्यांना पत्ता असतो का? सापाला त्याचा पत्ता सांगता येईल का? असे प्रश्न पडलेली छोटी सुजाता, एक म्हातारी नागीण, भरपूर गाणी, गंमत आणि दंगा असलेली ही नाटुकली बघायला नक्की या. माणूस, भीती आणि साप याला जोडून घेणारी ही गोष्ट मास्क, संगीत आणि पपेट यांचा वापर करून सादर केली जाते. मुलांबरोबर मोठ्यांनाही या नाटकातल्या म्हाताऱ्या नागिणीला भेटायला नक्की आवडेल!