-10%

Chikupiku Bhaubeej Special Gift Pack | चिकूपिकू भाऊबीज स्पेशल गिफ्ट पॅक!

भावा-बहिणीची जोडी आणि खेळांची धमाल! 

या खास गिफ्ट पॅकमध्ये आहे Board Game, Activity Book with Art Kit, Creative Drawing Book, मज्जा बिज्जा Booklet आणि भावा-बहिणीच्या जोडीसाठी Balancing Bird Toy FREE!

या गिफ्ट पॅकमध्ये काय काय मिळणार?

1. Board Game 2

माऊ-बाऊ, डायनोसॉर, अंतराळ, शिवाजी महाराजांचे किल्ले अशा भन्नाट थीम्सवर आधारित 7 मजेदार गेम्स! भावा-बहिणींनी एकत्र खेळण्यासाठी आणि धमाल करण्यासाठी मस्त पर्याय!

2. Activity Kit 1 (With Art Kit)

क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून करता येणाऱ्या मजेदार ॲक्टिव्हिटीज! चिकटकाम, कातरकाम आणि रंगकामाची मजा, तीही लागणाऱ्या साहित्याच्या किटसह!

3. मज्जा बिज्जा – Activity Booklet

शब्दकोडी, चित्र रंगवा, ठिपके जोडा, रस्ता शोधा अशा भरपूर मजेदार ॲक्टिव्हिटीज! छोटंसं, हलकं आणि प्रवासातही सहज सोबत नेता येणारं पुस्तक.

4. चिमणी चित्रं – Creative Drawing Book

'चित्र असंच काढायचं!' असं न सांगता मुलांच्या कल्पनाशक्तीला मोकळं आकाश देणारं खास पुस्तक! चित्रकलेच्या 40 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मराठी आणि English अशा दोन्ही भाषांत!

5. FREE! Balancing Bird Toy Activity

भावा-बहिणींनी मिळून तयार करायचं एक मजेदार Balancing Bird Toy! पक्षी तयार करण्याची, त्याचा तोल सांभाळण्याची आणि एकत्र धमाल करण्याची खास ॲक्टिव्हिटी!

यंदाची भाऊबीज करूया आणखी खास!

खेळ, चित्रं, रंग आणि मजेदार ॲक्टिव्हिटीजमधून भावा-बहिणींना मिळेल एकत्र वेळ घालवण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची संधी!

आजच मागवा चिकूपिकूचा भाऊबीज स्पेशल गिफ्ट पॅक!

₹780.00 ₹699.00SAVE 10%

Shipping calculated at checkout.
Out of stock

FAQ's

माझं मूल अजून वाचत नाही, लहान आहे. आत्तापासून कशाला पुस्तकं घ्यायची?

अगदी १ वर्षाच्या बाळालासुद्धा आपण बडबडगीतं म्हणून आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकवून खेळवतो, भरवतो, झोपवतो. चिकूपिकू तुम्हाला या गोष्टी सांगायला, गाणी म्हणायला मदत करेल. प्रत्येक पानावर रंगीत चित्रं असलेलं पुस्तक मुलांना बघायला सुद्धा आवडतं आणि त्यातली गोष्ट तुम्ही वाचून दाखवलीत की पुस्तकात अशी मजा असते हे मुलांना कळेल. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मुलांनी अगदी लहान वयातच पुस्तकाशी मैत्री करणं गरजेचं आहे. सुरुवातीला पानं फाटतील, पुस्तकावर रेघोट्या उमटतील पण त्याने चिकूपिकूशी मुलाची नक्की मैत्री होईल आणि हळूहळू वाचनाची गोडी लागेल.

इंग्लिश मिडीयमच्या मुलांना हे कसं उपयोगी पडेल?

मूल जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असेल, तरी मातृभाषेत सांगितलेल्या गोष्टींमुळे भावनिक विकास साधला जातो. १ ते ८ वयोगटातील मुलं आपण घरी जी भाषा बोलतो त्याच भाषेत विचार करतात आणि व्यक्त होऊ शकतात. हे लक्षात घेऊन अंकातील बहुतेक गोष्टी मराठी भाषेत आहेत. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात

मलाच मराठीमधलं एवढं छान वाचता येत नाही. मुलांना कसं वाचून दाखवणार?

आमचं ऑडिओ गोष्टींचं अँप सुद्धा आहे ज्यात छान रंगवून सांगितलेल्या ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत. तुम्ही अँप मधल्या गोष्टी ऐकत, पुस्तक समोर धरून चित्र बघत चिकूपिकू एन्जॉय करू शकता.

नक्की कोणत्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे चिकूपिकू?

हे मासिक १ ते ८ वयोगटातल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडतं. ८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षरओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.

काय काय येतं सबस्क्रिप्शन मध्ये?

सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. तुम्ही मासिकाच्या सबस्क्रिप्शनमध्ये एका वर्षाचे १० अंक घरपोच येतात. ज्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक, एप्रिल-मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक आणि बाकी महिन्यांचा प्रत्येकी एक असे १० अंक समाविष्ट आहेत. ऑडिओ अँप सबस्क्रिप्शन मध्ये जम्मत गोष्टी या आमच्या ऑडिओ अँप चा ऍक्सेस मिळतो ज्यामध्ये अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि इतर भरपूर प्लेलिस्ट मिळून ७०० हून जास्त गोष्टी आणि गाणी आहेत.

कोणत्याही महिन्यात सुरू करता येतं का?

ज्या महिन्यात सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्याच महिन्यापासून अंक मिळायला सुरुवात होते. ६ महिने, १ वर्ष, २ वर्षे यातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तेवढे महिने अंक घरी येत राहील.

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.

Chikupiku Bhaubeej Special Gift Pack | चिकूपिकू भाऊबीज स्पेशल गिफ्ट पॅक!

₹780.00 ₹699.00