वर्षाच्या सुरुवातीलाच हालचाल, चुळबुळ, धावपळ आणि वळवळ असलेला अंक घेऊन आलो आहोत. ज्या घरात लहान मूल असतं तिथे सदैव ही चुळबुळ सुरूच असते. अशी सारखी हालचाल करण्याची मुलांना काय गरज असते त्याबद्दल 'मूलप्रश्न' मध्ये डॉ. श्रुती पानसे यांनी दिलेली माहिती नक्की वाचा. आपणही ही वळवळ स्वीकारून स्वतःसुद्धा जास्त active राहण्याचा प्रयत्न करू या. अंकातल्या वेगवेगळ्या हालचालींच्या गोष्टी, कविता वाचा आणि आवडल्या का हे नक्की सांगा. या नवीन वर्षात तुम्हाला भरपूर खेळायला, पळायला, उड्या मारायला मिळोत आणि मुलांबरोबर मुलांसारखी धमाल करायला मिळो या शुभेच्छा!