काय मग, आता शाळेत जाणार का? शाळेत ताई ओरडतात हं!
मोठी माणसं मुलांशी शाळेविषयी नेहमी बोलतं असतात. पण या सगळ्यात मुलांच्या मनात नक्की काय सुरु असत? या विषयीच हे पुस्तक.
लहानांना आणि मोठ्यांनासुद्धा, ही तर माझीच गोष्ट आहे! असं वाटेल. माधुरी पुरंदरे यांनी इतकं सुंदर हे पुस्तक मांडलंय की आपण शाळेच्या कोपऱ्यात बसून हे सर्व पाहत आहोत की काय असं वाटतं. हे पुस्तक वाचून आई-बाबांना आणि आजी आजोबांनाही आपल्या शाळेचे दिवस नक्कीच आठवतील. पुस्तकातली चित्रं पाहून मुलांबरोबर आपणही या शाळेत नक्कीच हरवून जाऊ.