शहरातल्या मुलांपासून जरा दुरावलेली आणि गावातल्या मुलांना आपलीशी वाटेल अशी सुंदर नदी या पुस्तकातून आपल्या भेटीला येते. तिच्या काठी काय काय घडतं, दादाने पाण्यात उडी मारली तेव्हा काय झालं याची सुंदर चित्र पुस्तकात आहेत. अक्षर ओळख नसलेल्या मुलांना चित्रं दाखवून गोष्ट सांगू या. एकदा सांगितलेली गोष्ट मुलं चित्रं बघून स्वतः सांगू शकतील. अक्षर ओळख असणारी मुलं स्वतः वाचू शकतील. छोट्या मुलांना वाचनाची सुरुवात करून देण्यासाठी सोपी, छोटी वाक्यं यात आहेत.