वातावरण बदलून टाकणारी संगीताची जादू घेऊन हा सुट्टी विशेषांक येत आहे. अंक हातात धरून त्यातली चित्र बघत, गोष्टी वाचत असताना अंकात दिलेल्या लिंक्स, QR कोड वापरून मुलांना गाणी, वाद्य ऐकवतासुद्धा येतील...
शिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल येईल असे खेळ, अॅक्टिव्हिटीज आहेत. अंकात भरपूर QR कोड्स /लिंक्स दिलेल्या आहेत. ते ऑडिओ/व्हिडिओआवर्जून मुलांबरोबर बघा. हा नक्कीच सुयोग्य स्किनटाईम होऊ शकेल. मुलांना नव्या गोष्टी कळतील, प्रश्न पडतील, कल्पना सुचतील.आनंद, उत्साह, दुःख अशा भावनांना प्रतिसाद देणारी आपल्या प्रत्येकाची काही खास गाणी ठरलेली असतात. तशी मुलांबरोबरचीसुद्धा गाण्यांची प्ले लिस्ट तयार करू या. काही जुनी, काही नवी, वेगवेगळ्या भाषांमधली, इन्स्ट्रुमेंटल अशी भरपूर गाणी मुलांसोबत ऐकू या. घरात आपापले उद्योग सुरु असताना बॅकग्राऊंडला संगीत चालू राहू दे. घरात सुंदर वातावरण तयार होईल. मुलांचा आणि आपला मेंदूही ताजातवाना होईल.
उन्हाळा वाढतोय तशी सुट्टीत काय करायचं याची काळजी पण वाढतेय का? दुपारच्या वेळी मुलांना घरी बसून करता येतील अशा चिक्कार गोष्टी चिकूपिकूच्या सुट्टी अंकात आहेत. गोष्टी ऐकत, गाणी म्हणत, कोडी सोडवत, चित्र काढत, खेळ खेळत ही सुट्टी मजेत घालवता येईल. चिकूपिकूला सोबत घेऊन रोज थोडा थोडा वेळ आईबाबांनीही मुलांबरोबर घालवला की मुलांच्या सुट्टीच्या आठवणी आंब्यासारख्याच गोड होतील.
संगीत विषयाला धरून भन्नाट गोष्टी आणि हमखास मजा येईल अशा कविता, कोडी आणि आईबाबांबरोबर एकत्र करता येतील अशा धमाल ॲक्टिव्हिटीज!