ChikuPikuChikuPikuChikuPiku

English Marathi Magazine and Audio Stories Subscription

₹1,499.00

Shipping calculated at checkout.

प्रत्येक महिन्याला एक अंक घरपोच + अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात + 365 नवीन ऑडिओ गोष्टी  दरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, हटके ॲक्टिव्हिटीज, कोडी आणि बरंच काही. चिकूपिकू मुद्दाम मराठीतून मुलांशी बोलतो. मूल जरी इंग्रजी माध्यमात शिकत असेल तरी ते विचार कुठल्या भाषेत करतं? गप्पा कुठल्या भाषेत मारतं? याचा विचार केला तर लहान वयातलं मातृभाषेचं महत्त्व लक्षात येईल.

Choose membeship Period: 1 Year

  • 1 Year
  • 2 Years
  • 3 Years
Will not ship until [19041994]
₹1,499.00
Out of stock

प्रत्येक महिन्याला एक अंक घरपोच + अंकातल्या सगळ्या गोष्टी आणि गाणी ऑडिओ स्वरूपात + 365 नवीन ऑडिओ गोष्टी  दरमहा घरपोच येणाऱ्या चिकूपिकूच्या अंकात असतात शास्त्रज्ञ, मराठी म्हणी, आजूबाजूचा निसर्ग यांवरच्या गोष्टी, चित्रकथा, ऐतिहासिक गोष्टी, ठेक्यात म्हणता येतील अशा कविता, हटके ॲक्टिव्हिटीज, कोडी आणि बरंच काही. चिकूपिकू मुद्दाम मराठीतून मुलांशी बोलतो. मूल जरी इंग्रजी माध्यमात शिकत असेल तरी ते विचार कुठल्या भाषेत करतं? गप्पा कुठल्या भाषेत मारतं? याचा विचार केला तर लहान वयातलं मातृभाषेचं महत्त्व लक्षात येईल.

मासिक : वर्षातून १० अंक, दिवाळी आणि सुट्टी विशेषांकासहित.ऑडिओ गोष्टी : चिकूपिकू अंकातल्या आणि इतर वेगवेगळ्या गोष्टी मिळून ३६५ ऑडिओ गोष्टी.चिकूपिकूची वैशिष्ट्ये :

  • ८ बहुरंगी बुद्धिमत्तांवर गाणी, गोष्टी, कोडी, खेळ
  • क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीज
  • भाषाविकासाच्या दृष्टीने मुलांना समजेल अशी सोपी भाषा
  • शास्त्रज्ञांच्या गोष्टी आणि सोपे प्रयोग
  • मुलांना गुंतवून स्क्रीन टाईम कमी करायला उपयोगी
  • मोटर स्किल्ससाठी हातांनी करून बघायचे प्रयोग

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

You may also like

FAQ’s

सबस्क्रिप्शन मध्ये काय काय समाविष्ट आहे?
सबस्क्रिप्शन म्हणजेच वार्षिक वर्गणी. सबस्क्रिप्शन मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरचा मिळून मोठा दिवाळी विशेषांक असतो आणि एप्रिल – मे मिळून मोठा सुट्टी विशेषांक असतो. बाकीच्या महिन्यांचे प्रत्येकी एक असे एकूण १० अंक मिळतील. प्रत्येक अंकातल्या गोष्टी या ऑडिओ स्टोरी स्वरूपात वेबसाईटवर उपलब्ध असतात. त्याशिवाय पालकांना आवडतील असे ब्लॉग, मुलांसाठी काही व्हिडिओ स्वरूपातील ऍक्टिव्हिटीज या फेसबुक, व्हाट्सअँप, यु-ट्यूबच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील.
टीप – वार्षिक वर्गणीमध्ये डिलीव्हरी चार्जेससुद्धा समाविष्ट आहेत. एक अंक पाठवण्यासाठी साधारण रु. 25 ते 30 चार्जेस लागतात. म्हणजेच वर्षाचे एकूण 10 अंक पाठवण्यासाठी पत्त्यानुसार रु. 250 ते 300 वितरण शुल्क लागते जे या सबस्क्रिप्शनमध्ये समाविष्ट आहे.* *जर काही कारणाने अंक परत आला (डिलिव्हरीच्या वेळी घरी कोणीच उपलब्ध नसेल, पत्ता बदलला असेल इत्यादी ) आणि आम्हाला अंक पुन्हा पाठवावा लागला तर त्याचे जास्तीचे ₹20 आकारले जातील.
चिकूपिकूमधील जास्तीत-जास्त मजकूर मराठी भाषेत का आहे?
मातृभाषा ही मुलाची पहिली भाषा असते. आई ज्या भाषेत बोलते ती भाषा आईच्या पोटात असल्यापासून मूल ऐकत असतं. ही भाषा त्याला जवळची असते, मातृभाषेत त्याला गोष्टींचं आकलन नीट होतं. हेच लक्षात घेऊन चिकूपिकू मासिकातला ८०% मजकूर मराठी भाषेत आहे. तसेच सोप्या इंग्रजी भाषेत एखादी गोष्ट/कविता आणि ऍक्टिव्हिटीज अंकात असतात.
१ ते ८ वयोगटातील सर्व मुलांसाठी हे मासिक उपयोगी ठरेल का?
८ ते ९ महिन्याच्या बाळालासुद्धा गोष्टी आवडतात. १ ते 3 वयोगटातील मुलांना जेवू घालताना, खेळवताना, झोपवताना, आई-बाबा, आजी-आजोबा चिकूपिकूचा उपयोग करू शकतील. ४ ते ५ वयोगटातील मुलांनासुद्धा गोष्टी वाचून दाखवायला लागतील. पण activities ही मुलं स्वतः करू शकतील. अक्षर ओळख असलेल्या ६ ते ८ वयोगटातील मुलं अंक स्वतः वाचू शकतील. पुष्कळदा मुलांना मोठ्या गोष्टी वाचायला आवडत नाहीत. चित्र रूपातल्या चिकूपिकू मासिकातील गोष्टी मुलं एन्जॉय करतील.
मासिक तुम्ही कुठे कुठे डिलिव्हर करू शकता?
भारतात जिथे इंडियन पोस्ट पोहोचू शकते अश्या सर्व ठिकाणी आम्ही चिकूपिकू मासिक पाठवू शकतो. पुण्यातील ऑर्डर्स DTDC द्वारे आणि पुण्याबाहेरील ऑर्डर्स या रजिस्टर्ड इंडियन पोस्टाने पाठवल्या जातात.
मासिक ऑनलाईन आहे का? मासिकाची Pdf आहे का?
चिकूपिकू मासिकाच्या उद्देशांपैकी काही म्हणजे मुलांचा स्क्रीन-टाइम कमी करणे, मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देणे, वाचनाची आवड वाढवणे, हातांनी ऍक्टिव्हिटीज करण्यास, वस्तू -खेळणी बनविण्यास प्रोत्साहन देणे ही आहेत. त्यामुळे हे हातात धरून वाचता येईल, त्यावर चित्र काढता, रंगवता येतील असं खरंखुरं मासिक आहे. काही जुन्या अंकांच्या pdf आम्ही सोयीसाठी आणि मासिक कसं आहे याची कल्पना येण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या वेबसाईटवरच्या E-book विभागात बघता येतील.
सबस्क्रिप्शन घेतल्यावर मासिक किती दिवसात येते ? आणि सबस्क्रिप्शन कधी संपेल ?
मासिक साधारण पणे सबस्क्रिप्शन घेतल्या दिवसापासुन १५ ते २० दिवसात येते. आणि ज्यांनी आधीच सबस्क्रिप्शन घेते आहे त्याची मासिके दर महिन्याच्या १५ ते २० तारखे पर्यंत येतात.
सुरुवात संपणार
पहिला अंक जानेवारीचा येणार शेवटचा अंक डिसेंबरचा येणार
पहिला अंक फेब्रुवारीचा येणार शेवटचा अंक जानेवारीचा येणार
पहिला अंक मार्चचा येणार शेवटचा अंक फेब्रुवारीचा येणार
पहिला अंक एप्रिल - मे चा येणार शेवटचा अंक मार्चचा येणार
पहिला अंक जूनचा येणार शेवटचा अंक एप्रिल - मे चा येणार
पहिला अंक जुलैचा येणार शेवटचा अंक जूनचा येणार
पहिला अंक ऑगस्टचा येणार शेवटचा अंक जुलैचा येणार
पहिला अंक सप्टेंबरचा येणार शेवटचा अंक ऑगस्टचा येणार
पहिला अंक ऑक्टोबर - नोव्हेंबरचा येणार शेवटचा अंक सप्टेंबरचा येणार
पहिला अंक डिसेंबरचा येणार शेवटचा अंक ऑक्टोबर - नोव्हेंबरचा येणार
Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Estimate Shipping
Add A Coupon

Estimate Shipping

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

English Marathi Magazine and Audio Stories Subscription

1 Year
1 Year
₹1,499.00