“कंटाळा आलाय!” मुलांचं हे वाक्य ऐकून घरातल्या मोठ्यांनाही कंटाळा येतो. पण हा कंटाळा खरंच एवढा वाईट असतो का?
या अंकात आपण कंटाळ्याच्या दुनियेत डोकावणार आहोत. सकाळी उठण्याचा, शाळेचा, खेळांचा, कामांचा आणि अगदी खाण्याचासुद्धा कंटाळा आलेल्या मुलांच्या मजेदार गोष्टी यात आहेत. आणि कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी लढवलेल्या भन्नाट कल्पनाही आहेत!
या अंकात आहेत:
कंटाळा आलेल्या मुलांच्या धमाल गोष्टी
प्राणी-पक्ष्यांनाही कंटाळा आला तर ते काय करतात?
शांता शेळके आणि विंदा करंदीकर यांच्या मजेदार कविता
‘कंटाळा रेस्क्यू किट’सारख्या भन्नाट Activities
मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे खेळ
थोडा कंटाळा आला तरी चालतो... त्यातूनच स्वतःसोबत रमणं, काहीतरी कल्पना सुचणं, नवीन खेळ शोधून काढणं, स्वतःशी विचार करायला शिकणं हे होऊ शकतं. हेच सांगणारा हा अंक नक्की वाचा.